रामलला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमा निमित्त वागदरी येथे विविध धार्मिक कार्यक्रमाने केला आनंदोत्सव साजरा
वागदरी, दि.२३ एस.के.गायकवाड:
दि.२२ जानेवारी रोजी अयोध्या राम मंदिरात रामलला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे औचित्य साधून तुळजापूर तालुक्यातील मौजे वागदरी येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून रामभक्त, ग्रामस्थानी केला आनंदोत्सव साजरा.
वागदरी हे वारकरी संप्रदायाचा गाव असून येथील श्री संत भवानसिंग महाराज भजनी मंडळाच्या वतीने समस्त ग्रामस्थांच्या सहभागातून रामललांच्या प्राणप्रतिष्ठाच्या निमित्ताने सकाळी ठिक ६. वा.दरम्यान टाळ मृदंगाच्या गजरात श्रीरामाचा जयघोषात गावातून राम फेरी काढण्यात आली. त्यामुळे गावात सर्वत्र आनंदी व भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर दुपारी ठिक १२.२९ मि.येथील हणुमान मंदिरात समुदायिकरित्या अयोध्या येथील वेळेनुसार श्री रामवर उपस्थित रामभक्तानी अक्षदा टाकून जय श्रीरामाच्या जयघोषाने गाव दणानुन सोडले. रामभक्ताच्या आनंदाला पारावर उरला नव्हता.प्रत्येकांच्या डोक्यावर भगवी टोपी आणि हातात भगवा झेंडा होता.यामुळे गावात भगवे वादळ निर्माण झाले होते. शेवटी सायंकाळी ठिक सहा सात वाजण्याच्या सुमारास येथील हणूमान मंदिरात रामभक्तानी ११११ पणत्या लावून दिपोत्सव साजरा करून महाप्रसादाने या आनंदोत्सवाची सांगता करण्यात आली. यासर्व कार्यक्रमात गावातील आबालवृद्ध स्त्री पुरूष युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.