श्रीरामलला प्रतिष्ठापना सोहळा  मोठा जल्लोष करत भक्तिमय वातावरणात व विविध धार्मिक कार्यक्रमाने उत्साहात साजरा

नळदुर्ग, दि.२२ : नेताजी महाबोले

  प्रभू श्रीरामलला प्रतिष्ठापना सोहळया निमित्त नळदुर्ग शहरात मोठा जल्लोष करत भक्तिमय वातावरणात व विविध धार्मिक कार्यक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील मंदिरे आकर्षकपणे सजविण्यात आले होते. सर्व मंदिरे भक्तांनी फुलून गेले होते.

नळदुर्ग शहरालगत असलेल्या  प्राचीन रामतिर्थ मंदिरसह , अंबाबाई मंदीर,दक्षिणमुखी आलियाबाद हनुमान मंदीर, स्वयंभू वीरभद्रेश्वर मंदीर,शिवलिंगेश्वर हिरेमठ, बाळकृष्ण मंदीर,  श्री उत्तरेशवर मंदिर , स्वा. सावरकर चौक, धर्मवीर संभाजी चौक, बाळासाहेब ठाकरे चौक, एसटी स्टँड समोर, छत्रपती शिवाजी चौक, मल्लिकार्जून मंदिर, चावडी चौक, महात्मा बसवेश्वर चौक, जयभवानी चौक येथे  श्रीरामचंद्र यांची महाआरती करून पूजा करण्यात आली. व रामतिर्थ मंदीर, हनुमान मंदीर येथे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले . तसेच राममंदीर येथील मंदीरापासून ते शहरातील सर्व मुख्य चौकातून, भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान यांच्या वतीने गावातील मुख्य रस्त्याने पालखी मिरवणूक काढण्यात आली व संध्याकाळी शहरातील  रामभक्तांच्या वतीने भव्य मिरवणूक काढून हा प्राण प्रतिष्ठापणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सायंकाळी घरासमोर रांगोळी काढून  दिवे लावण्यात आले.
 
Top