आलियाबाद येथील बचत गटाच्या अध्यक्षा रंजना राठोड यांना हिरकणी पुरस्कार             

नळदुर्ग ,दि.१२

   आमदार राणाजगजितसिंह पाटील व जि प च्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव येथे लेडीज क्लब आयोजित हिरकणी महोत्सव 2024  या स्तुत्य कार्यक्रमात दि 6 जानेवारी ते 10 जानेवारी या कालावधीत एकूण 172 विविध स्टॉल  प्रदर्शन व विक्रीसाठी उपलब्ध करून दिले होते .या मधून तुळजापूर तालुक्यातील अलियाबाद येथील जय सेवालाल बचत गटातील महिलांनी हस्तकलेने बनविलेल्या  बंजारा पारंपरिक विविध आकर्षक वस्तु येथील स्टॉलवर प्रदर्शन आणि विक्री साठी ठेवले होते


 यासाठी उत्कृष्ठ खप, उत्कृष्ठ मांडणी ,उत्कृष्ठ विक्री कौशल्य व उतेजनार्थ गटाच्या अध्यक्षा रंजना विलास राठोड यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र तुळजापुरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील व अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते हिरकणी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.याबद्दल माजी जि.प .अध्यक्षा अस्मिता कांबळे, भाजपच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पुनगुडे ताई, माजी पंचायत समिती सभापती रेणूका इंगोले,विद्या माने, निशिगंधा पाटील, मा. जिप सदस्या सविता सोनटक्के आदींनी अभिनंदन केले .                                   

 गटातील इंदुमती राठोड, सपना राठोड, रंजना चव्हाण, शांता राठोड, भारता पवार, अस्मिता पवार, फुलाबाई राठोड, शांता पवार, गुजाबाई राठोड आदी महिला एकत्रित येऊन हा व्यवसाय करतात यांचाही यामध्ये मोलाचा वाटा आहे.

 
Top