नळदुर्ग महामार्गावर रास्ता रोको अंदोलंन ; नार्वेकर यांना अक्रमक झालेल्या शिवसैनिकाकडून जोड्याचा प्रसाद
नळदुर्ग ,दि.१२
सत्ताधारी पक्षाचे लोकशाही विरुध्द कटकारस्थान थांबले नाही तर भविष्यात आमदार , मंञ्याना धाराशिव जिल्ह्यात पाय ठेवु देणार नसल्याचा इशारा शिवसेनेचे
माजी उपजिल्हा प्रमुख कमलाकर चव्हाण यानी नळदुर्ग येथे रास्ता रोको व जोडे मारो आदोंलन प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांनी नळदुर्ग येथे महामार्गावर दि.१२ जानेवारी रोजी शिवसेना नेते कमलाकर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोखो व जोडेमारो आंदोलन करण्यात आले. लोकशाहीची हत्या करणा-या नार्वेकराचा जाहिर निषेधाचा फलक घेवुन महामार्गावर रास्ता रोको आदोंलन करण्यात आला.
या आदोंलनात शिवसैनिकानी काळे झेंडे घेवुन हाताला काळ्या फिती बांधले होते. निषेधाचे फलक शिवसैनिकानी हातात घेतले होते.यावेळी जोडेमारो आदोंलन प्रसंगी अनेकानी अक्रमक शैलीत व टिकात्मक मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी उप जिल्हा प्रमुख कमलाकर चव्हाण, जिल्हा महिला आघाडी प्रमुख सौ.शामल वडणे, तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी , तालुका उपप्रमुख सरदारसिंग ठाकूर , शहर प्रमुख संतोष पुदाले , ग्राहक संरक्षण कक्ष तालुका प्रमुख मेजर राजेंद्र जाधव , कृष्णात मोरे, ज्ञानेश्वर भोसले, महादेव पवार , सरपंच शिवाजी कदम, शाम कनकधर, सुर्यकांत घोडके, रवीद्र दबडे, तुळजापूर कृर्षी उत्पन्न बाजार समितीचे व तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक सुनिल जाधव, संजय भोसले,उपशहर प्रमुख सोमनाथ म्हेञे, उपतालुका प्रमुख संजय भोसले, तालुका महिला आघाडी प्रमुख सुरेखा मुळे, तुळजापूर शहर प्रमुख शोभा शिंदे, , सुरज साळुंके, छोटू घुगे, परमेश्वर चिनगुंडे,ओंकार कलशेट्टी, शंकर कोळी, भिमा कोळी, दयानंद घोडके, प्रताप चव्हाण, संतोष मोटे आदी उपस्थित होते.