लोहारा येथे अयोध्यातून आलेल्या अक्षता कलशाची लोहारा गावातून उत्साहात शोभायात्रा संपन्न

लोहारा :दि.१२

           अयोध्येतील निर्मानाधीन भव्य मंदिरात श्री प्रभू रामचंद्राच्या मृर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. यानिमित्ताने अयोध्यातून आलेल्या अक्षता कलशाचे लोहारा शहरात आगमन होताच यावेळी राम भक्तांनी व ग्रामस्थांनी फटाके फोडून जंगी स्वागत केले. यावेळी लोहारा शहरातुन टाळ, मृदुंग, वारकऱ्यांच्या व डी. जे.वर प्रभू रामाच्या व इतर मराठी हिंदी भक्तिमय गितांच्या तालावर तरुणाईने ठेका धरत मोठ्या उत्साहात रामाच्या प्रतिमेची व राम, लक्ष्मण व सिता माईच्या वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांची आकर्षक सजवलेल्या रथातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. 
       
 लोहारा येथील श्रीराम मंदिर येथे महाआरती आणि मंगल अक्षता कलशाचे गुरुवर्य ह.भ.प.महेश महाराज माकणीकर व ब्रम्हकुमारी सरिता बहणजी
यांच्या हस्ते पुजन करुन शोभा यात्रेची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रभारी नायब तहसीलदार माधव जाधव, नगराध्यक्ष वैशाली खराडे, माजी सैनिक राजेंद्र सूर्यवंशी, भाजपा तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, नगरसेवक अविनाश माळी, प्रशांत काळे, जालिंदर कोकणे, तालुका उपाध्यक्ष संपत देवकर, के.टी.पाटील, दगडु तिगाडे, मदन कुलकर्णी, बबन महाराज उंडरगावकर, प्रमोद पोतदार, ओम कोरे, प्रमोद बंगले, सतिश गिरी, हरी लोखंडे, नाना पाटील, बालाजी मक्तेदार, नेताजी शिंदे, प्रशांत लांडगे, शरणू कुंभार, गौरव गोसावी, मोहित मक्तेदार, सूरज पवार, सचिन माळी, महादेव सुतार, यांच्यासह शेकडो रामभक्त मोठ्या संख्येने या शोभा यात्रेत सहभागी झाले होते.
      

 या शोभायात्रेत रथामध्ये राजशाही प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता हे रथावर आणि वनवासी रूपातील राम, लक्ष्मण, सीता, रामभक्त हनुमान, बाल रूपामध्ये रामलल्ला, या सुंदर वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी देखाव्यातून प्रभू श्रीरामाचे जीवनपट साकारलेले पाहून वातावरण अतिशय राममय झाले होते. या शोभायात्रेमध्ये लोहारा येथील हरिहर भजनी मंडळ, कास्ती येथील पांडुरंग वासुदेव, न्यू. व्हिजन इंग्लिश स्कूलमधील चिमुकले स्वामी विवेकानंद, मांसाहेब जिजाऊ, यांच्या वेशभूषेत विद्यार्थी, तसेच तालुक्यातील मार्डी, मोघा, जेवळी, वाडी वडगाव, भोसगा, आष्टा, हिपरगा (रवा), उंडरगाव, नागराळ, नागुर, कास्ती, खेड, लोहारा (खु) या गावातील तरुण, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हि शोभायात्रा लोहारा येथील श्रीराम मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा फुले चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, हिप्परगा रोड, आझाद चौक, जगदंबा मंदीर, शिवनगर, न्यायालयासमोरून, तहसील रोड, रजिस्ट्री ऑफिस, श्रीगिरे हॉस्पिटल या मार्गाने निघून भारतमाता मंदिर याठिकाणी शोभायात्रेचा समारोप झाला. यावेळी उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
       
शोभायात्रेच्या यशस्वीेतेसाठी शहाजी जाधव, दत्ता जावळे-पाटील, श्रीनिवास माळी, मनोज तिगाडे, दत्तात्रय पोतदार, कल्याण ढगे, यशवंत चंदनशिवे, दत्ता दंडगुले, विरेष स्वामी, प्रमोद पोतदार, दगडु तिगाडे, श्रीशैल्य जट्टे, युवराज जाधव, किशोर होनाजे, प्रदिप ढोबळे, गणेश हिप्परगेकर, दत्ता दंडगुले, संभाजी पोतदार, शिवराज झिंगाडे, संतोष फावडे, देवा महाजन, महेश चपळे, प्रेम लांडगे, सुयश दंडगुले, यांच्यासह आदिंनी परिश्रम घेतले.
 
Top