जेवळी येथे अयोध्येहून आलेल्या अक्षता कलशाचे स्वागत
लोहारा :दि.१२
अयोध्येतील निर्मानाधीन भव्य मंदिरात श्री प्रभू रामचंद्राच्या मृर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. यानिमित्ताने अयोध्यातून आलेल्या अक्षता कलशाची जेवळी (ता. लोहारा) गावातून मोठ्या उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली.
अयोध्येतील नवनिर्मित भव्य मंदिरात २२ जानेवारीला श्री प्रभू रामचंद्रांची मूर्तीचे प्राणप्रतिष्ठापणा सोहळा पार पडत आहे. त्यानिमित्ताने अयोध्या येथून अभिमंत्रित होऊन आलेल्या अक्षता कलशाचे जेवळी येथे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करुन स्वागत करून शोभायात्रा काढण्यात आली.ग या अक्षता कलश दिंडीचा शुभारंभ उपसरपंच बसवराज कारभारी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, भाजपा तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, तालुका उपाध्यक्ष शिवाजी दंडगुले, माजी उपसरपंच भोजप्पा कारभारी, सुभाष बिराजदार, युवा सेनेचे तालुका उपप्रमुख शिवराज चिनगुंडे, कॉंग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय गाडेकर ग्रा. पं. सदस्य नागेश पणुरे, महादेव कारभारी, सुरेश दंडगुले आदींची उपस्थिती होती.
या शोभायात्रेत जेवळीसह दक्षिण जेवळी, रुद्रवाडी, हिप्परगा (सय्यद), तुगाव, मोघा, फनेपूर, वडगाव, भोसगा आदी गावातील भजनी दिंड्या सहभागी झाले होते. यावेळी भगवे पताके, श्रीरामाचा उल्लेख केलेले उपरणे व डोक्यावर टोप्या घालून भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने गाव भक्तीमय व भगवामय झाले होते. यावेळी ठिक ठिकाणी घरासमोर सडा- रांगोळी घालून या अक्षता कलश दिंडीचे नागरिकांनी उत्साहात स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी रथावर आरूढ झालेले श्रीराम सीता बरोबरच रामायणातील विविध व्यक्तिरेखा साकारली होती. परिसरातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
यावेळी पैलवान अरुण हावळे व त्यांच्या चेहल्यांने गावात घरोघरी जाऊन अक्षता, श्रीराम फोटो आणि पत्रांचे वाटप केले आहे. शेवटी येथील श्री गुरु सिद्धेश्वर विरक्त मठात या दिंडीचा समारोप झाला. उपस्थित भाविक भक्तांना सुभाष मडोळे यांच्याकडून महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी जेवळी येथील कारसेवक परमेश्वर तोरकडे, सुरेश भुसाप्पा, सुधीर कोरे व सहभागी भजनी मंडळींचे मठाधीश म.नी.प्र श्री गुरु गंगाधर महास्वामीजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी वैजीनाथ पाटील, हभप कमलाकर कोळी, हभप हरी गाडेकर, चंद्रकांत ढोबळे, सिद्राम भुसाप्पा, आणप्पा बिराजदार, महेश सुरवसे, सत्तेवर ढोबळे, रवि घोडके, रविराज सोळसे, पृथ्वीराज कारभारी, शिवाजी फुलसुंदर, शहाजी जाधव दत्तात्रय पोतदार युवराज जाधव, जगदीश बेडगे, मनोहर माळी, संजय पोतदार, वैजीनाथ सोळसे, रोहीत कारभारी, रमेश मुरमे, महादेव हावळे, भीमाशंकर कलशेट्टी, अनिल भैरप्पा आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी अरूण हावळे, किशोर होनाजे, बालाजी चव्हाण, श्रीशैल बिराजदार, सुधीर कोरे, वैजीनाथ होनाजे, सुरेश डिग्गे, शैलेश नकाशे, नंदकुमार वेदपाठक, चेतन शिंदे, शंकर साखरे आदींनी परिश्रम घेतले.