धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कूल ने केली १९ पदकांची कमाई
लोहारा : दि.१२
मार्शल आर्ट गेम सिरीज - २ व चौथी लाठी नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धा राजीव गांधी इनडोअर स्टेडियम बावणा न्यू दिल्ली येथे पार पडली. या स्पर्धेत धानुरी (ता. लोहारा) येथील विद्यामाता इंग्लिश स्कुलच्या ८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत १४ सुवर्ण, ४ रौप्य, व १ कांस्य पदक अश्या १९ पदकांची कमाई केली.
यावेळी दिल्ली ऑलिंपिकचे सहसचिव दीपक अग्रवाल ,सुभाष मोहिते, लाठी इंडियाचे अध्यक्ष अजय शहा व लाठी कोच व टेक्निकल डायरेक्टर महमदरफी शेख यांच्या हस्ते यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मेडल व पारितोषिक वाटप करण्यात आले.
धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कूल येथील ८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये समर्थ भोंडवे, राजवीर चव्हाण, प्रणव कदम, सृष्टी सुरवसे, समर्थ कुलकर्णी, अंकिता पाटील, तृप्ती पाटील, आरुषी जाधव या विद्यार्थ्यांनी लाठी काठी स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करीत एकूण १४ सुवर्ण पदक , ४ रोप्य पदक, व १ कास्य पदक अश्या एकुण १९ पदकांची कमाई करीत विद्यामाता इंग्लिश स्कुकचे नाव लौकिक केले.
या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन महमदरफी शेख व क्रीडा शिक्षक सोमनाथ कुसळकर यांचे लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका हिरा सोलापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अशोकराव जवळगे, सचिव किशोर साळुंके यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले.
या यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा विद्यामाता इंग्लिश स्कुलमध्ये ओम सुर्यवंशी, सुवर्णा शिंदे, ज्योती साठे, आशा कांबळे, हरुन हेडडे, रंजीत कांबळे, शिवमाला हुडगे, अश्विनी आळंगे, सोमनाथ कुसळकर प्रतीक्षा गिराम, अस्मिता मम्माने, मनीषा तेलकर, रोहिणी यादव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.