वसंतनगर शाळेत नूतन शाळा व्यवस्थापन समितीची निवड
वागदरी,दि.२४ एस.के.गायकवाड
.जि.प.प्रा.शा.वसंतनगर नळदुर्ग येथे पालक सभेतून सर्वानुमते नूतन शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली.उपस्थित पालकाच्या सहविचाराने शा.व्य.स.अध्यक्षपदी श्री. नवनाथ गंगाराम पवार उपाध्यक्षपदी सौ. प्रीती प्रवीण जाधव तर सदस्यपदी सुधाकर माणिक राठोड, दयानंद चंदू जाधव, हनुमंत तिम्मा पवार, बाळू बाबू पवार, अशोक सुभाष चव्हाण, सौ.संगीता संतोष घाटे, सौ. अंबिका दत्ता दूर्लेकर सौ. माधुरी संतोष लोंढे ,सौ.रविना संजय राठोड, सौ.मिना दत्ता राठोड,शिक्षण तज्ञ म्हणून श्री. किसन वसाराम राठोड,शिक्षक प्रतिनिधी श्री.सोनवणे डी.एन.तर विद्यार्थी प्रतिनिधी कु.प्रतिभा रवी राठोड,कु. वैभव नामदेव गायकवाड तर सचिव म्हणून.मु.अ.श्री.सुरवसे एच.एम.यांची निवड करण्यात आली.
पालक सभेच्या अध्यक्षस्थानी श्री. मोतीराम पोमा राठोड तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.लक्ष्मण किसन चव्हाण, श्री.किसन राठोड हे उपस्थित होते. प्रथमतः क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक सुरवसे एच.एम. यांनी केले. उपस्थितांचे स्वागत कुलकर्णी एस.जी., राठोड ए.एस.व मु.अ.सुरवसे एच.एम.यांनी तर उपस्थित मातांचे स्वागत श्रीम.वाघमारे व्हि.एल.यांनी केले.शाळा व्यवस्थापन समिती रचना व कार्य याविषयी माहिती सोनवणे डी.एन.यांनी सांगितली.यावेळी माजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.रवी राठोड यांचाही उत्कृष्ट कार्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.पालक सभेचे सूत्रसंचालन व आभार सोनवणे डी.एन.यांनी मानले.