गुरुजी कथामालाचे गोवा येथे ५६ राष्ट्रीय अधिवेशन
वागदरी ,दि.२४ एस.के.गायकवाड
धाराशिव साने गुरुजी कथामाला जिल्हा समिती व धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघ -अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे ५६ वे(पुज्यनीय साने गुरुजी शतकोत्तर रजत जयंती वर्ष (२०२३-२०२४ )चे अधिवेशन गोवा येथे २८ व २९ जानेवारी २०२४ रोजी दामोदर संस्थान जांबावली व्हाया केपे गोवा येथे कथामालाचे अध्यक्ष शामराव कराळे,उपाध्यक्ष अशोक म्हमाणे,कार्याध्यक्ष लालासाहेब पाटील, प्रमुख कार्यवाह सुनील पुजारी महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.
प्रमुख पाहुणे समाज कल्याण व पुरातन खाते मंत्री गोवा शासनाचे सुभाष फळदेसाई तर स्वागताध्यक्षपदी गोवाचे उद्योजक संदीप निकळये हे उपस्थित राहणार आहेत. सदर अधिवेशनात"श्यामची आई व महिला सशक्तीकरणाचा स्तोत ","साने गुरुजी साहित्य आणि सांस्कृतीक परंपरा,कथाकथन भाषिक आवड आणि अभिरुचीसाठी गरज,कथाकथन विविध कलांचे मूळ असे चार परिसंवाद होणार आहे. त्याचप्रमाणे गोमंतीय लोकनृत्ये ,कथाकथन खुले अधिवेशन होणार आहे, तरी धाराशिव जिल्ह्यातील कथामालेचे सभासद व साने गुरुजी प्रेमी यांना अधिवेशनात सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य श्रीहरी जाधव व शिंदे सुदर्शन जिल्हा समिती अध्यक्ष डी.के.कुलकर्णी व जिल्हा अध्यक्ष सुरेश टेकाळे यांनी केले.