रासेयो शिबिरात ग्रीन क्लबची पर्यावरण संवर्धन रॅली

नळदुर्ग ,दि.२४  प्रा. डॉ. दिपक जगदाळे 

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग  ता.तुळजापूर जि.धाराशीव च्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत मौजे वागदरी या गावात राष्ट्रीय सेवा योजना यांची विशेष शिबिर जानेवारी 19 ते 25 दरम्यान संपन्न होत आहे. 

विशेष वार्षिक शिबीरादरम्यान ग्रीन क्लब समन्वयक प्रा. डॅा.उद्धव भाले यांच्या संकल्पनेतून एक दिवस ‘ग्रीन क्लब’ च्या नावाने राबवण्यात आला.यादरम्यान दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी गावातून विद्यार्थी व ग्रामस्थांसह रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये ग्रीन क्लब,राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना विद्यार्थी- विध्यार्थिनी व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी, स्वयंसेवक इत्यादी उपस्थित होते. 


ज्यामध्ये पर्यावरण जनजागृती, पाणी बचत व प्लास्टीक फ्री गाव या अनुषंगाने घोषणांनी व संबोधनांनी गाव दणाणून निघाले. या विषयांच्या अनुषंगाने  विविध फलकांचे प्रदर्शन करत विद्यार्थ्यांमार्फत गावातील प्लास्टीक कचरा जमा करणे, गळके नळ शोधून दुरूस्त करणे, सांडपाणी व कचरा विल्हेवाटीसंदर्भात तातडीने संबंधीत नागरिकांस संबोधन करणे अशा अनेक क्लृप्त्यांद्वारे पर्यावरणपूरक वातावरण निर्मीती करण्यात आली.

दुपारच्या सत्रात ग्रीन क्लब समन्वयक प्राध्यापक डॅा.उद्धव भाले यांनी विद्यार्थी व ग्रामस्थांना ‘युवकांच्या सहाय्याने नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण व पाणी बचत’ या विषयावर विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. या व्याख्यानामध्ये युवकांनी पुढाकार घेऊन आपापल्या गावांमध्ये नैसर्गिक संसाधनाची जपणूक त्यामध्ये पाणीबचत . ऊर्जा व्यवस्थापन . कचरा व्यवस्थापन आणि जैवविविधता संवर्धन या अनुषंगाने मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांमध्ये ग्रीन क्लब ची भूमिका,कार्य  आणि उद्देश यावर दैनंदिन जीवनात वापरत असलेल्या नैसर्गिक  संसाधनाचा उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले व त्याद्वारे ग्रीन क्लब च्या सर्व उद्देशांची मांडणी त्यांनी उपस्थितांसमोर करून एकंदरीत YEWS (युवा सहभागाने पाणी बचत) अभियान सहजपणे सर्वांसमोर ठेवून त्याचे महत्व पटवून देत उपस्थितांचा विश्वास व प्रतिसाद प्राप्त केला.प्रा.डॅा.उद्धव भाले यांच्या कृतीप्रवणतेनी राबवलेला हा उपक्रम ग्रीन क्लब अभियानामध्ये विशेष महत्वाचा आहे. त्याबरोबर ग्रीन क्लब च्या माध्यमातून या गावातील विविध अशा प्रकारचे सर्वे करण्यात आले त्यामध्ये ग्रीन ऑडिट म्हणजे महत्त्वाच्या झाडांची संख्या, पाळीव प्राणी ऑडिट, त्यामध्ये दूध देणारे जनावरे ऑडिट, वॉशिंग मशीन ऑडिट आणि गावामध्ये विविध प्रकारे पाणी वापरण्याचा प्रकाराचे ऑडिट असे अत्यंत महत्त्वाचे कामे या ग्रीन क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेले  आहेत. 


 हा दिवसभराचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा दादासाहेब जाधव,  प्रा बाबासाहेब, प्रा. डॉ. युवराज पाटील, प्रा डॉ पी एस गायकवाड , प्रा डॉ निलेश शेरे, प्रा धनंजय चौधरी ,प्रा बालाजी क्षीरसागर, प्रा गजानन चिंचनवाड, प्रा डॉ अशोक कांबळे तसेच ग्रीन क्लब मधील व राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्र सेनातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा दादासाहेब जाधव होते तर सुत्रसंचलन बाबासाहेब सावते  यानी  मानले.    
 
Top