रिपाइं (आठवले)पक्षाची जिल्हा बैठक संपन्न : राजाभाऊ ओहाळ यांची धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी फेर निवड
नळदुर्ग ,दि.२५ एस.के.गायकवाड
रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) पक्षाची धाराशिव जिल्हा बैठक येथील शासकीय विश्राम ग्रहात अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली असून या बैठकित रिपाइं (आठवले) धाराशिव जिल्हा अध्यक्ष पदी रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश जाँइंट सेक्रेटरी राजाभाऊ ओहाळ यांची फेर निवड करण्यात आली तर काही किरकोळ फेर बदल वगळता उरवरी जिल्हा व सर्व तालुका कार्यकारणीला पुर्ववत मान्यता देण्यात आली असून दि.२६ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित रिपाइंच्या जिल्हा मेळाव्याच्या पूर्व तयारी सह अन्य महत्त्वाच्या विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे.
रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय व आधिकारिता राज्य मंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत दि.२६ फेब्रुवारी २०२४ रोजी धाराशिव येते पँथर चळवळीतील बुद्धीजीवी जेष्ठ विचावंत नेते कालकथीत यशपाल सरवदे यांच्या प्रथम स्मृती दिनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या स्मरणीकेचे प्रकाशन व रिपाइंच्या जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या पुर्व तयारी करण्याच्या द्रष्टीने ही महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली होती.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष तथा प्रदेश जाँइंट सेक्रेटरी राजाभाऊ ओहाळ हे होते. तर रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय बनसोडे, हरीश डावरे, मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष आनंद पांडागळे,मराठवाडा विभाग उपाध्यक्ष भागवत शिंदे,पोपट लांडगे,मराठवाडा विभाग सचिव बंडूभाऊ बनसोड, रिपाइं जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, आदींची प्रमुख उपस्थित होती.
यावेळी बोलताना राजाभाऊ ओहाळ म्हणाले की रिपब्लिकन पक्षाची चळवळ मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी परीश्रम घेऊन दि.२६ फेब्रुवारी २०२४ रोजी धाराशिव येथे आयोजित रिपाइंचा मेळावा मोठ्या प्रमाणात यशस्वी करावा असे आवाहन या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ओहाळ यांनी केले.
यावेळी रिपाइंचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रमुख विद्यानंद बनसोड, जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष रणजित गायकवाड, युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष रवी माळाळे, उपाध्यक्ष संपत जानराव,युवा कार्याध्यक्ष अरूण लोखंडे, जिल्हा संघटक पद्माकर धावारे,धाराशिव तालुका अध्यक्ष भालचंद्र कठारे,तुळजापूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब मस्के, उमरगा तालुका अध्यक्ष सुभाष सोनकांबळे,परंडा तालुका अध्यक्ष उत्तम ओहाळ, भूम तालुका अध्यक्ष अमोल शिंदे, कळब तालुका अध्यक्ष शिवाजी शिरसाठ,युवा आघाडी जिल्हा सरचिटणीस मुन्ना ओहाळ,राहुल हौसलमल,नुतन नळदुर्ग शहर अध्यक्ष मारूती खारवे, धाराशिव शहराध्यक्ष उदय बनसोडे, दादासाहेब सरवदे, बालाजी आवटे,विपीन हौसलमल, संजय शिंदे, जुलेखां शेख,महिला आघाडीच्या आशा कांबळे, उष्ण खंडागळे,मुकुंद साखरे,तुळजापूर युवा तालुका सरचिटणीस शुभम कदम,प्रताप कदम,तानाजी उमाजी कदम,सागर माळाळे, स्वराज जानराव, विशाल ओहाळ, सोनु माळाळे,सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.