नळदुर्ग येथे रिपाइंचे नुतन शहराध्यक्ष खारवे व मेडिया सेलचे तालुका अध्यक्ष गायकवाड यांचा सत्कार संपन्न
नळदुर्ग , दि.२७ एस.के.गायकवाड:
रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) चे नुतन नळदुर्ग शहराध्यक्ष मारुती खारवे व मेडिया सेलचे नुतन तुळजापूर तालुका अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांचा विविध पक्ष, संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
धाराशिव येते नुकतच रिपाइं (आठवले) पक्षाची जिल्हा बैठक संपन्न झाली. या बैठकीत नळदुर्ग ता.तुळजापूर येथील आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे यांची रिपाइंच्या नळदुर्ग शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तर पत्रकार प्रकाश गायकवाड यांची रिपाइं मेडिया सेलच्या तुळजापूर तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
नळदुर्ग येथील डॉ.आंबेडकर इंटरनँशनल इंग्लिश स्कूलमध्ये रिपाइं (आठवले) सह विविध पक्ष व संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाइं युवा आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष अरूण लोखंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून पँथर चळवळीतील जेष्ठ नेते प्रमोद कांबळे, रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे व सहशिक्षक सचिन कांबळे आदी होते. प्रारंभी रिपाइंचे मावळते नळदुर्ग शहराध्यक्ष दत्ता बनसोडे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना मारूती खारवे म्हणाले की पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा न जावु देता पक्षाच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी रिपाइंचे नळदुर्ग शहर सरचिटणीस उत्तम डावरे, आरविंद लोखंडे, अनिल वाघमारे,मिलिंद कांबळे, भिम-आण्णा सामाजिक संघटनेचे जिल्हा संघटक धर्मराज देडे, सामाजिक कार्यकर्ते आरविंद गायकवाड, सूर्यकांत सुरवसे , लाडाप्पा माने आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बौद्धाचार्य दादासाहेब बनसोडे तर सुत्रसंचलन धाराशिव जिल्हा सचिव एस.के.गायकवाड यांनी केले . आभार भारतीय दलित पँथरचे जिल्हा संपर्क प्रमुख शाम नागीले यांनी मानले.