जिल्हा परिषद प्राथमिक  शाळेमध्ये बांधलेल्या कट्ट्याचे लोकार्पण

अणदुर ,दि.२७ :


 तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथिल   जिल्हा  परिषद  प्राथमिक  शाळेचे (वत्सलानगर )  सहशिक्षक  कुलकर्णी विकास  यानी त्यांच्या मातोश्री कै उशावती वसंतराव कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या वाचन व भोजन कट्ट्याचे लोकार्पण नळदुर्ग येथील जय हिंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष  संजय बताले, ब्राह्मण संघटनेचे नळदुर्ग शहर अध्यक्ष  विनायक अहंकारी , पत्रकार विलास येडगे तसेच सामाजिक कार्यकर्ते अजहर जहागीरदार यांच्या हास्ते करण्यात आले.

  विनायक अहंकारी यांनी आईवर प्रेम करा, आईचे उपकार विसरता येणार नाहीत असे सांगितले.  अध्यक्षीय समारोपात संजय बताले यांनी वाचन कट्टा बांधण्याचा उद्देश मुलांना समजावून सांगितला. या कार्यक्रमास नूतन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्यांनी उपस्थित होते.  हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापिका श्रीममती दराडे , ज्येष्ठ शिक्षक बनसोडे , स्वामी , खलाटे , आरदवाड , बागवान , व आडम , गणेश नननवरे  आदीनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरी  यानी तर आभार कुलकर्णी  मांनले.
 
Top