नळदुर्ग,दि.१६ 

 नळदुर्ग शहर विकासासाठी पक्ष, संघटना, जात धर्म विसरुन एकदिलाने काम करा असे आवाहन करत भाजपाच्या पदाधिका-यांना अपप्रवृतीविरूद्ध  लढण्याचा  सल्ला अध्यक्षीय समारोप करताना  संघ परिवारातील आभ्यासू पत्रकार तथा प्रत्येक ठिकाणी कनखर व स्पष्ट भुमिका घेणारे पत्रकार सुधीर पोतदार यांनी दिला.

 शहर भाजपच्या वतीने शहरातील मध्यवर्ती भाजपा कार्यालयात पत्रकारासांठी सोमवार दि. १५ जानेवारी रोजी मकर संक्रातीनिमित्त तीळगुळ स्नेहमिलन व पत्रकारांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. संघ परिवारात चार दशकापासून कार्यरत असलेले पत्रकार सुधीर पोतदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.  
   
यावेळी शहरातील पत्रकारांनी आजतागायत तटस्थ, कसलीही भीडभाड न ठेवता केलेली पत्रकारीता समाजासाठी व शहर विकासासाठी महत्त्वाची असल्याचे मत व्यक्त करत शाहरारातील पत्रकारांचा इतिहास उलगडत  पत्रकार सुनील बनसोडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर पत्रकार तानाजी जाधव यांनी पत्रकारीता करताना येणाऱ्या अडचणी, भविष्यातील खाचखळगे याबद्दल पत्रकारांनी जागरूक राहून काम करावे हे सांगताना पत्रकारांच्या गुण वैशिष्ट्याबाद्दल माहिती दिली.


यांचा करण्यात आला गौरव

पञकार विलास येडगे, तानाजी जाधव, सुहास येडगे, सुधीर पोतदार,  शिवाजी नाईक, सुनील बनसोडे, लतिफ शेख, भगवंत सुरवसे, उत्तम बनजगोळे, दादासाहेब बनसोडे, विशाल डुकरे,  सुनील गव्हाणे,  आयुब शेख, अजित चव्हाण, सतिश राठोड, पञकार मिञ अमर भाळे आदीचा यांचा लेखणी, श्रीफळ, पुष्पगुच्छ, पुष्पहार  देवून व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक , सुञसंचलन सुनिल बनसोडे तर आभार सुनिल चौधरी यांनी मानले.

यावेळी भाजपाचे सुनील बनसोडे, सुनील चौधरी, गणेश मोरडे, मयूर महाबोले, रीयाज शेख, विशाल डुकरे, सागर हजारे, संजय विठ्ठल जाधव, योगेश सुरवसे, संतोष जाधव, प्रदीप ग्रामोपाध्ये, गोटू पुदाले, विकी डुकरे, राहूल कुलकर्णी, शरद देशमुख, राहूल जाधव, आवेज सय्यद, मुद्दसर शेख,
अबुल हसन रिझवी उपस्थित होते.
 
Top