महामार्ग पोलीस केंद्राच्या वतीने सोलापूर - हैद्राबाद महामार्गावर रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ
नळदुर्ग ,दि.१६ :
दि.१६ जानेवारी रोजी रस्ता सुरक्षा अभियान राबवण्याच्या उद्देशाने अपर महासंचालक रविंद्र कुमार सिंगल ,पोलीस अधीक्षक महामार्ग छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र श्रीमती जमादार , विभागाचे पोलीस उप अधीक्षक डीसले ,पो. नि. गिरी छ.संभाजीनगर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अभियान-2024 अन्वये महामार्ग पोलीस केन्द्र नळदुर्गच्या वतीने सोलापूर हैद्राबाद महामार्गावरील फुलवाडी (ता.तुळजापूर) टोलनाका येथे रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानाचा शुभारंभ करण्यात आला .
तुळजापूर तालुक्यातील फुलवाडी येथे महामार्गावर वाहन चालक , मालक व नागरीक यांना थाबवुन रस्ता सुरक्षा अभियानाची माहीती देवुन त्यांना वाहतुक नियमाबाबत माहीती देत जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमात अंदाजे 100 ते 150 नागरीक व पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच फुलवाडी टोल नाका येथील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
वाहन चालकांना दिल्या सुचना
रस्त्यावर धोकादायक रित्या भरधाव वेगाने ऊस वाहतूक करू नये, ओव्हर टेक करू नये, धोकादायक रित्या रस्त्यावर ऊस ट्रॅक्टर उभा करू नये, आढळल्यास योग्य अशी कायदेशीर कारवाई करण्यात येईल, ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनधारकांनि आपल्या वाहनास मी पाठीमागील बाजूस व चारही दिशांनी रिफ्लेक्टर लावून घ्यावेत, महामार्गावर ऊस वाहतूक करीत असताना मोठ मोठ्याने गाणी लावून वाहन चालवू नये, मद्यपान करून कोणतेही वाहन चालवू नये. सोबत सरकारी वाहन व चार अंमलदार आहेत. वाहन परवाना/कागदपत्रे सोबत बाळगणे,वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये, वेग मर्यादाचे पालन करावे, ओव्हरटेक करताना उजव्या बाजूने वाहन चालवावे.
मोटर वाहन कायद्याअंतर्गत वाढ झालेल्या दंडाच्या रकमेबाबत समजावून सांगितले.
ट्रॅक्टर व ट्रचालकाने सोबत क्लीनर ठेवणे बाबत सूचना दिल्या,वाहनांवर विशेषतः पाठी मागील बाजू रिफ्लेक्टर लावावे महामार्गावर धोकादायक परिस्थितीत कोणतेही वाहन थांबवू नये, वाहन चालवताना वाहतूक चिन्हे पाहून त्या सूचना प्रमाणे वाहन चालवावे , ज्या वाहनांवर प्रलंबित दंड आहेत त्यांनी महामार्ग पोलिस.केंद्राशी संपर्क साधून तात्काळ दंड भरून घ्यावेत, ट्रॅक्टर व ट्रचालकाने वाहन चालविताना घेण्याबाबतची काळजी व खबरदारी तसेच स्वतःची व दुसऱ्याची हानी होणार नाही याबाबत सूचना दिल्या आहेत.