नळदुर्ग शहरात ब्राह्मण समाजाकडून साजरा होणार प्रभू श्रीरामचंद्र प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद उत्सव

नळदुर्ग, दि. १६


22 जानेवारी रोजी आयोध्या येथे देशातला सर्वात मोठा उत्सव साजरा होतं आहे..यनिमित्ताने नळदुर्ग शहरात ब्राह्मण समाजाच्या वतीने 17 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये दररोज एका मंदिरात महाआरती केली जाणार आहे.. दि.17 जानेवारीला ब्राह्मण गल्ली येथील श्रीराम मंदिरात महाआरतीने या उत्सवाला सुरुवात होईल.. दि.18 जानेवारी रोजी नदीकडील मारुती मंदिर व त्वरिता देवी ( वैद्य वाडा ) या मंदिरात आरती होईल.. दि.19 जानेवारी रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदिर ( गवळी गल्ली ) येथे आरती होईल.. दिनांक 20 जानेवारीला दुपारी 4 ते 7 या वेळेत श्रीराम मंदिरात सुंदरकांड वाचन करण्यात येईल त्यानंतर मल्लिकार्जुन मंदिर येथे महाआरती होईल.. दिनांक 21 जानेवारीला सायं 5 वाजता 1992 साली आयोध्या येथे कारसेवेला गेलेल्या कारसेवकांचा सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे..त्यानंतर सायं 6 वाजता सामूहिक रामरक्षा पठण होणार आहे..तर सायं 7 वाजता संपूर्ण श्रीराम मंदिर दीपोत्सवाने उजळून निघणार आहे..
22 तारखेला मुख्य प्राणप्रतिष्ठा सोहळा दिवशी दुपारी 12.40 मिनिटांनी महाआरती व फटाक्याची आतिषबाजी केली जाणार आहे.


या संपूर्ण कार्यक्रमासाठी नळदुर्ग शहरातील हिंदू बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन नळदुर्ग शहर ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष विनायक अहंकारी व सचिव मुकुंद नाईक यांनी केले आहे...
 
Top