नळदुर्ग: श्री क्षेत्र रामतीर्थ मंदिरात रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त सोमवारी  विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

नळदुर्ग, दि.२१

 शहराजवळील पुरातन रामतीर्थ येथील मंदिरात रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त सोमवार दि. 22 जानेवारी रोजी  विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 


प्रभू श्री रामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या निसर्गरम्य परिसरातील राममंदिरात सोमवारी    सकाळी 8 वाजता अभिषेक, दुपारी 12:30 वाजता महाआरती,    दुपारी 1 ते 4 पर्यंत श्री विशाल रोचकरी तुळजापूर यांच्यातर्फे  महाप्रसाद , सायंकाळी ७  वाजता दीपोत्सव , माळी परिवार जळकोट, अंबर परिवार मुरूम यांच्यातर्फे रात्री 7 ते 9  पर्यंत महाप्रसाद वाटप होणार आहे. तरी भाविक भक्तांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री राम देवस्थान च्या वतीने करण्यात आले आहे.



 
Top