पत्रकारांच्या सहकार्याने नळदुर्गची विकासाकडे वाटचाल ; महाराष्ट्र राज्य काँगेस कमिटीचे सचिव शकील मौलवी यांचे गौरव उदगार
नळदुर्ग,दि.०७ : नेताजी महाबोले
ऐतिहासिक नळदुर्ग हे महत्वाच्या ठिकाणी असलेले शहर असुन विकास होण्यासाठी पत्रकार बंधूचे सहकार्य खूप महत्वाचे आहे. समाजातल्या सर्व चांगल्या गोष्टी हे पत्रकार जागृत राहिल्यावर घडत असतात. युनिटी मल्टीकॉन्स कंपनीच्या माध्यमातून नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्याची माहिती पत्रकारांनी महाराष्ट्रासह देशभर पोहोचवुन पर्यटकाना आकर्षित केल्याने आज या किल्ल्यास ख-या आर्थाने गतवैभव मिळाले असल्याचे गौरव उदगार महाराष्ट्र राज्य काँगेस कमिटीचे सचिव शकील मौलवी यांनी काढले.
सोलापूरच्या युनिटी मल्टिकाॅन्स प्रा. लि. कंपनीच्या वतीने नळदुर्गचा भुईकोट किल्ला संंगोपनार्थ व जतन करण्यासाठी शासनाकडून भाडेतत्तावर घेवुन महाराष्ट्रात
किल्ल्याचे रोल माॕडेल केल्याचे सर्वश्रुत ठरले आहे.दि.६ जानेवारी रोजी दर्पण दिनी आयोजित पत्रकारांचा गौरव कार्यक्रमात शकील मौलवी हे बोलत होते.
हा कार्यक्रम नळदुर्ग येथील युनिवंडर्स रिसाॅर्ट येथे युनिटी मल्टिकाॅन्स प्रा लि.कपंनीचे मुख्य संचालक कफील मौलवी, संचालक जयधवल करमरकर, संचालिका श्रीमती वैशालीताई जैन यांच्या वतीने आयोजित केला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष शफीभाई शेख तर प्रमुख अतिथी म्हणून युनिटीचे मुख्य संचालक कफील मौलवी यांचे जेष्ठ बंधू शकील मौलवी, माजी नगराध्यक्ष शहबाज काझी, नितीन कासार, मुस्ताक कुरेशी, माजी नगरसेवक बसवराज धरणे, कमलाकर चव्हाण, विनायक अंहकांरी, शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर घोडके, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, सरदासिंग ठाकूर शिवसेना उपतालुका प्रमुख (ठाकरे गट) आदी उपस्थित होते.
पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव, सुनील बनसोडे, डाॕ. प्रा. पांडुरंग पोळे, प्रा. दिपक जगदाळे, संतोष पुदाले, दादासाहेब बनसोडे ,शिवाजी नाईक, उत्तम बनजगोळे, भगवंत सुरवसे, लतीफ शेख, अजित चव्हाण , सुनील गव्हाणे, अय्युब शेख, शोयेब काझी, जहिर इनामदार, नेताजी महाबोले, मुजम्मिल शेख, शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख शिवाजी सुरवसे, बंडू कसेकर, पञकार मिञ अमर भाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व पत्रकार बांधवांचे लेखणी (पेन) पुष्पहार शाल फेटा व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवारानी पञकार दिनानिमित्त मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या. पञकारांच्यावतीने डाँ पांडुरंग पोळे , सुनिल बनसोडे , तानाजी जाधव, संतोष पुदाले यानी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुञसंचलन , आभार विनायक अहंकारी यानी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युनिटी व्यवस्थापक जुबेर काझी, विनायक अहंकारी यानी पुढाकार घेतला.