नळदुर्ग  शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण करीत, पेढे वाटून , आतिषबाजी करून केला जल्लोष 


नळदुर्ग ,दि. ११

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना  एकनाथ शिंदे यांची  असल्याचे  वाचन करुन जाहिर होताच नळदुर्ग  शहरांमध्ये शिंदे गटाच्या  कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून फटाकाची आतिषबाजी करत  पेढे वाटून आनंदोत्सव साजरा  केला.


 नळदुर्ग  शहरातील  जय मल्हार नगर , बाळासाहेब ठाकरे चौक येथे आतिषबाजी करून पेढे वाटण्यात आले. त्यानंतर संविधान चौकमध्ये आतिषबाजी करून गुलालाची उधळण करून पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला व घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक येथेही फटाक्याची आतिषबाजी करून गुलालाची उधळण करून पेढे वाटण्यात आले.

यानंतर गावातील चावडी चौकात शिंदे गटाच्या  शिवसैनिक ,पदाधिकारी यांनी फटाक्याची आतिषबाजी करून गुलालाची उधळण , जयघोष करण्यात आले. एकमेकाला पेढे भरविण्यात आले. शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, शिवसेना शहरप्रमुख दीपक घोडके, युवा सेना शहरप्रमुख अफझल कुरेशी, विधानसभा शहर संघटक दीपक घोडके, ज्येष्ठ शिवसैनिक मनोज मिश्रा, बंडू कसेकर ,बाबू गायकवाड, सचिन शिंदे, विलास मोरे ,गजानन हळदे, नितीन सुरवसे, श्रीकांत जाधव यांच्यासह  शिवसैनिक उपस्थित होते.

 
 
Top