विकसित भारत संकल्प यात्रा नळदुर्ग शहरात पोहंचली 

नळदुर्ग,दि.११

केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती व आंमलबजानी करून देशातील सर्व गांवे वाडी वस्तीतील उपेक्षित लाभार्थ्यांना त्या योजनांचा लाभ देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार  यांच्या मार्गदर्शनाखाली ही विकसित भारत संकल्पन यात्रा नळदुर्ग येथे दि.११ जानेवारी  आगमन झाले.

 याप्रसंगी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजना पीएम स्वनिधी, प्रधानमंत्री आवास घरकुल योजना, आयुष्यमान भारत योजना,दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान,विश्वकर्मा योजना आदीसह विविध योजनांची माहिती देण्यात आली. त्यांनतर विकसित भारत संकल्पची सामूहिकरीत्या शपथ घेण्यात आली.
   तसेच सदर योजनेत पात्र लाभार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व घरकुल योजनेचे लाभार्थी पापा काझी व पीएम स्वनिधीचे लाभार्थी मूनवर पटेल , बायदाबाई कांबळे, इंदुमती साळुंके तसेच  कल्पना गायकवाड व जिजाबाई जाधव यांनी लाभ मिळविल्याबद्दल मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे , भाजपचे शहराध्यक्ष  धिमाजी घुगे, पञकार सुहास येडगे, भगवंत सुरवसे, विलास येडगे,  सुनिल बनसोडे, लतीफ शेख, भाजपचे कार्यकर्ते गणेश मोरडे   आदीसह शहरातील नागरिक आणि  न.प. कार्यालयीन अधिकक्ष अजय काकडे, नगर अभियंता वैभव चिंचोले, दीक्षा शिरसाट, समीर मोकाशी, दीपक कांबळे, खंडू शिंदे , ज्योती  बाचाटे, अण्णा जाधव, अमित गायकवाड, नवनाथ होनराव, सुशांत भालेकर, नितीन पवार,प्रवीण चव्हाण,मुंतजीब शेख तसेच आरोग्य कर्मचारीसह नागरिक  उपस्थित होते.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक प्रकल्प अधिकारी सुरज गायकवाड यांनी केले तर आभार  अजय काकडे यांनी  मानले.
 
Top