स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मनसेने सादर केला अहवाल ; सहाय्यक निबंधक यांची भेट घेऊन दिला अहवाल
नळदुर्ग ,दि.१६
नळदुर्ग येथे स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यापूर्वी अनेकवेळा सरकारकडे केली असून याबाबत मनसेने दहा पानाचा अहवाल सहाय्यक निबंधक यांच्याकडे सादर केला आहे.
यामध्ये निवेदन,सोयी सुविधा,परिसरातील गावे,उपलब्ध जागा,जि.उपनिबंधक यांचे पत्र वं इतर बाबी नमूद केलेले आहे, ७० गावाचे नळदुर्ग हेच केंद्रस्थान आहे,शिवाय दोन राष्ट्रीय महामार्ग लाभलेले शहर असून या ठिकाणी परिसरातील शेतकरी बांधव व शहरातील शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे बहुतांश लोकांचा व्यवसाय हा शेतीच असल्याने शेतमालाला योग्य भाव येऊन चार पैसे पदरात जास्त मिळावी हीच अपेक्षा असते,सद्या तुळजापूर, लातूर,सोलापूर आदी ठिकाणी जाऊन शेतकरी माल विकत आहेत. त्यात त्यांना पदरमोड करून वाहन खर्च करावा लागत आहे,नळदुर्ग येथे तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची उपसमिती स्थापन करायच्या हालचाली सुरु असल्याने त्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध दर्शवीला आहे, कारण त्यात नळदुर्गचे महत्व कमी होणार असून नळदुर्गला त्याचा काय फायदा, उपसमितीचा घाट घालून कायमच नळदुर्ग वर अन्याय करणाऱ्या सरकारला मनसेच्या रोषाला सामोरे जावं लागेल असा इशारा मनसेने माध्यमा समोर दिला आहे.
मनसेने दिलेल्या अहवालातील निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव,जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार,विधानसभा अध्यक्ष मयूर गाढवे,तालुका सरचिटणीस गणेश पाटील,नळदुर्ग शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,जनहित कक्षाचे ऍड.मतीन बाडेवाले,शहर उपाध्यक्ष रमेश घोडके,शहर संघटक रवि राठोड,मनविसे तालुकाध्यक्ष सूरज चव्हाण,तालुका उपाध्यक्ष गणेश बिराजदार,मनविसे नळदुर्ग शहराध्यक्ष निखिल येडगे यांच्या स्वाक्षरी आहेत.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख पदाधिका-यांनी सहाय्यक निबंधक यांची भेट घेऊन चर्चा करून अहवालावर विचार व्हावा अशी मागणी केली आहे.