जयहिंद प्रतिष्ठानच्या वतीने येत्या शनिवारी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन, युवकानी सहभागी होण्याचे संजय बताले यांचे आवाहन

नळदुर्ग ,दि.१७

राजमाता  जिजाऊ माॕसाहेब व युगपुरुष श्री  स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त  पंधरवाडा सप्ताह ,भव्य रक्तदान शिबीर  शनिवार दि.२० जानेवारी रोजी नळदुर्ग शहरातील मल्लिकार्जुन मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आल्याची माहिती जयहिंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय बताले यांनी दिली.


 जय हिंद प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी रक्तदान शिबिरात युवकानी जास्तीत जास्त सहभागी व्हावे,  रक्तदानाने कोणाचे तरी जीव वाचणार आहे आणि म्हणून आपण केलेले रक्तदान किती मूल्यवान आहे, मोलाचे आहे. अमूल्य आहे हे प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे आहे. गेल्या वर्षभरात 40 ते 50 गरजवंत पेशंटला विनामूल्य रक्त  पुरवठा करण्यात आले आहे.


 या सहकार्याबद्दल स्वतः पेशंट, त्यांचे कुटुंब ,त्यांचे नातेवाईक अगदी मनापासून आभाररुपी आशीर्वाद देतात. ते आशीर्वाद फक्त आणि फक्त रक्तदाते‌ यांनाच जातो. आणि कळत नकळत रक्तदाते हेच पुण्यांचे वाटेकरी बनतात. रक्तदान शिबिराचे ७ वे वर्ष  आहे.जयहिंद प्रतिष्ठान हे एक माध्यम आहे. खरे तर दानवीर हे रक्तदान करणारे रक्तदातेच आहेत. या राष्ट्रीय एकात्मिक कार्यक्रमात आपण आपले सामाजिक कर्तव्य जबाबदारी कार्य समजून आपण वेळात वेळ काढून आपले अमूल्य असे रक्तदान करून बहुमोल असे योगदान देत या भव्य रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवण्याचे आवाहन संजय बताले यांनी केले.
 
Top