वागदरी येथे श्रीराम मंदिर अक्षदा कलशाचे उस्फुर्तपणे स्वागत : जय श्रीरामाच्या जयघोष करीत रामभक्तानी अक्षदा कलशाची काढली मिरवणूक

वागदरी, दि. १८: एस.के.गायकवाड

राम जन्म भूमी अयोध्या येथे दि.२२ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या ऐतिहासिक श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने अयोध्या येथून आलेल्या श्रीराम मंदिर अक्षदा कलशाचे वागदरी ता.तुळजापूर येथे भाविक भक्तानी उस्फुर्तपणे स्वागत करून टाळ मृदगाच्या दिंडीसह श्रीरामाचा जयघोषात अक्षदा कलशाची  मिरवणूक काढण्यात आली.
  
 श्रीराम  मंदिर अक्षदा कलशाचे वागदरीत आगमन होताच रामभक्तानी फटाक्यांची आतिषबाजी करून जय श्रीराम असा जयघोष करित आनंद व्यक्त केला. उपस्थित रामभक्तानी मनोभावे अक्षदा कलशाची पुजा करून गावातील मुख्य रस्त्यावरुन उघड्या जिपमधुन श्रीरामच्या भव्य दिव्य प्रतिमेची व अक्षदा कलशाची मिरवणूक काढली.या मिरवणुकीत टाळ  मृदंगासह वारकरी दिंडीचा व डोक्यावर कलश घेऊन महिलांचा, शाळकरी विद्यार्थ्यांचा,रामभक्त युवक युवती,जेष्ठ रामभक्त, ग्रामस्थांचा मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. मिरवणूकीच्या मार्गावर आपापल्या घरासमोर रस्ते  स्वच्छ करून रांगोळी काढून श्रीराम मंदिर अक्षदा कलशाचे घरोघरी मनोभावे पुजन केले.

शेवटी गावातील मुख्य चौकात मारूती मंदिरात या कलश मिरवणूकीची सांगता करण्यात आली.यावेळी दि.२२ जानेवारी २०२४ अयोध्या श्रीराम मंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी घरोघरी आनंद उत्सव साजरा करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला.
 
Top