रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश सचिव यशवंत नडगम यांचे तुळजापूर येथे जंगी स्वागत
वागदरी,दि.१८ एस.के.गायकवाड
रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) चे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा भारतीय दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडगम (पुणे) यांचे तुळजापूर येथे अगमन होताच रिपाइं (आठवले) कार्यकर्ते यांच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.
रिपाइं (आठवले) चे प्रदेश सचिव यशवंत नडगम हे सोलापूर तुळजापूर मार्गे लातूरला जात असताना तुळजापूर येथे शासकीय विश्राम गृहात रिपाइं (आठवले) तुळजापूर शहर व तालुका शाखेच्या वतीने त्यांचे शाल,पुष्पहार,पुष्पगुच्छ व बूके देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी कार्यकर्त्यांना बोलताना ते म्हणाले की रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय व आधिकारिता राज्य मंत्री ना. रामदास आठवले हे खऱ्या अर्थाने देशपातळीवर बहुजना,दिव्यांगाना न्याय देण्यासाठी संघर्ष करीत आहेत. तेंव्हा रिपब्लिकन युवा कार्यकर्ते यांनी छोटे मोठे उद्योग धंदे सुरु करून आर्थिक स्त्रोत निर्माण करून आपापसातील हेवेदावे बाजूला ठेवून गावा गावात रिपाइं शाखेची बांधनी करून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा.
या प्रसंगी रिपाइंचे जिल्हा समन्वयक एस.के.गायकवाड, दलित पँथरचे जिल्हा संपर्क प्रमुख, शामकांत नागीले, रिपाइंचे विधानसभा अध्यक्ष प्रकाश कदम, शहराध्यक्ष अरुण कदम,शहर युवा आघाडी अध्यक्ष अमोल कदम, रोजगार आघाडी तालुका अध्यक्ष आप्पा कदम,युवा आघाडी तालुका सरचिटणीस शुभम कदम, महादेव सोनवणे, भैरू कदम,युवा कार्यकर्ते लाडाप्पा माने,अमोल इटकर सह कार्यकर्ते उपस्थित होते.