येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे वार्षिक शिबीर दि. १९ जानेवारी २०२४ ते २४ जानेवारी २०२४ मौजे वागदरी ता. तुळजापूर येथे संपन्न होत आहे .या शिबिराचे उद्घाटन बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव प्रकाशराव चौगुले हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास संस्थेचे सचिव उल्हास बोरगांवकर , कार्याध्यक्ष रामचंद्र आलुरे , उपाध्यक्ष डॉ. अभयकुमार शाहपूरकर , कोषाध्यक्ष ॲड. प्रदीप मंठगे , सहसचिव शहबाझ काझी , संचालक बाबुराव चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांनी केले आहे.