नंदगाव-तुळजापूर ही बससेवा पूर्ववत सुरु करा-मनसे

नळदुर्ग ,दि.१९

तुळजापूर तालुक्यातील   नंदगाव-तुळजापूर ही एस.टी. बससेवा नळदुर्ग मार्गे पूर्ववत सुरु करण्याची मागणी मनसेच्यावतीने धाराशिव राज्य परिवहन एस.टी. महामंडळ विभाग नियंञक आधिकारी यांच्याकडे केली आहे.

 कोरोना काळाच्या अगोदर सुरु होती.परंतु कोरोना काळात ही बससेवा बंद करण्यात आली. ती अद्याप पर्यंत ही बंदच आहे.ही बससेवा बंद झाल्याने तुळजापूर,धाराशिव येथे नोकरीं निमित्त दररोज ये-जा करणारे अनेक प्रवाशी यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.,ही बससेवा पूर्ववत सुरु झाल्यास नोकरीं करणारे व त्याच बरोबर विद्यार्थी,व्यापारी, व भाविक यांची मोठी सोय होणार असून,यापैकी अनेकांनी मनसे पदाधिका-यांची भेट घेत ही बससेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली.


  त्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने धाराशिव विभाग नियंत्रक यांना निवेदन देऊन ही नंदगाव(नळदुर्ग मार्गे )तुळजापूर बससेवा लवकरात लवकर सुरु करून प्रवाश्याना सोयीचे करावे अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे,निवेदनावर जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर उपाध्यक्ष रमेश घोडके,शहर संघटक रवि राठोड यांच्या स्वाक्षरी आहेत.
 
Top