राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच सामाजीक कार्याची आवड निर्माण होते : माजी मंत्री मधुकरराव चव्हाण
वागदरी , एस.के.गायकवाड:
राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच सामाजिक कार्याची आवड निर्माण होते.हे जरी खरे असले तरीही विद्यार्थ्यांनी आपले आई वडिल व गुरुजनांचा आदर करुन त्यांच्या आज्ञेचे पालन करून नियमित आभ्यास केल्यास त्यांना अपेक्षित यश निश्चित मिळते.असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा बालाघाट शिक्षण संस्थाचे अध्यक्ष मधुकरराव चव्हाण यांनी वागदरी ता.तुळजापूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
बालाघाट शिक्षण संस्था नळदुर्ग संचलीत कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने "युवकांचा ध्यास,ग्रामशहर विकास"बालविवाह जनजागृती विशेष वार्षिक सेवायोजन शिबिर २०२४ चे दि.१९ ते २४ जानेवारी २०२४ दरम्यान वागदरी येथे आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिराचे उदघाटन माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या शैक्षणिक चळवळीचा व विचारांचा आदर्श समोर ठेवून ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर व गोरगरीब मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून बालाघाट शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाविद्यालयीन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. तेंव्हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळालेल्या उच्च शिक्षणाच्या संधीचा फायदा घेऊन आपला व आपल्या कुटुंबाचा पर्यायाने गावचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करावा.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाघाट शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष प्रदिपराव मंटके हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच तेजाबाई शिवाजी मिटकर, उपसरपंच मीनाक्षी महादेव बिराजदार, तंटामुक्त अध्यक्ष राजकुमार पवार,शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष प्रशांत मिटकर आदी उपस्थित होते. प्रारंभी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून या शिबिराचे उदघाटन करण्यात आले. या शिबिरात ग्राम स्वच्छता,जलसंधारण, व्यक्तीमत्व विकास, शालेय विद्यार्थी दंत चिकित्सा शिबीर, नव मतदार जनजागृती, श्रमदान, वृक्षारोपन,महिला मेळावा व पर्यावरण जनजागृती फेरी आदी उपक्रम राबविले जाणार आहेत.
यावेळी जेष्ठ कार्यकर्ते शिवाजी मिटकर गुरूजी, ग्रा.प.सदस्य ज्ञानेश्वर पाटील,अमोल पवार,सुरेखा भालचंद्र यादव,माजी उपसरपंच दत्ता सुरवसे, बालाजी बिराजदार,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामसिंग परिहार, एस.के.गायकवाड,प्रमोद सोमवंशी,उपप्राचार्य प्रा.डॉ.रामदास ढोकळे,परिवेक्षक प्रा.नेताजी जाधव, प्रा.अँड पांडुरंग पोळे,प्रा.डॉ. दिपक जगदाळे, प्रा.डॉ. पंडीत गायकवाड, प्रा.डॉ.दयानंद भोवाळ, प्रा.जयश्री घोडके, प्रा.झरीना पठाण,प्रा.अशोक कांबळे ,सह महाविद्यालयतील सर्व प्राध्यापक,प्राध्यापिका,
शिकक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी ग्रामस्थ, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.सुभाष राठोड यांनी केले तर सुत्रसंचलन प्रा.डॉ.संतोष पवार यांनी केले व आभार कार्यक्रम आधिकारी प्रा.डॉ.डी.जी.जाधव यानी केले.