शालेय क्रीडा स्पर्धेत  वागदरीच्या विद्यार्थ्यांचे  यश : शाळेच्या व ग्रामस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांचा दर्पण दिनी  गौरव

वागदरी ,दि.०८ एस.के.गायकवाड


जि.प.प्राथमिक शाळा वागदरी ता.तुळजापूर येथील शालेय विद्यार्थ्यांनी नळदुर्ग बिट स्तरावरील आयोजित विविध शालेय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले असून सर्व यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांचा पत्रकार दिनी  शाळेच्या व ग्रामस्थांच्या वतीने प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
  

  नुकतेच घेण्यात आलेल्या नळदुर्ग बीट स्तरीय विविध  शालेय क्रीडा स्पर्धेत जि.प.प्राथमिक शाळा वागदरी येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून तालुका स्तरावरील क्रीडा स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे. या मध्ये खोखो मुली प्रथम क्रमांक, थ्रो बॉल मुली प्रथम क्रमांक, हॉलीबॉल मुली प्रथम क्रमांक,थ्रो बॉल मुले प्रथम क्रमांक,५० मीटर धावणे विश्वंभर शिवाजी पाटील तृतीय क्रमांक, १०० मीटर धावणे आहाद इसामोद्दीन शेख तृतीय क्रमांक, १०० मीटर धावणे,श्रावणी तानाजी वचने तृतीय क्रमांक,१०० मीटर धावणे शंभूराजे विश्वनाथ मिटकर द्वितीय क्रमांक,२०० मीटर धावणे ,प्रज्ञा विश्वनाथ पाटील तृतीय क्रमांक ६०० मीटर धावणे जोया नुरोद्दीन शेख तृतीय क्रमांक,६०० मीटर धावणे प्रद्युम्न विश्वनाथ पाटील तृतीय क्रमांक,गोळा फेक
साक्षी लक्ष्मण झेंडारे द्वितीय क्रमांक, १०० मीटर रिले मुली तृतीय क्रमांक,१०० मीटर रिले मुले प्रथम क्रमांक,१५०० मीटर धावणे मुले शिवशंकर चंद्रकांत चिनगुंडे तर वैष्णवी बाबासाहेब वाघमारे प्रश्न मंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक,श्रावणी चरणसिंग परिहार निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

या सर्व विद्यार्थ्यांनी खेळाचे मैदान गाजविले व तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झाले आहेत.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती साखरे , श्रीमती चौधरी , श्री तानाजी लोहार , व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती महादेवी  जत्ते , यांचे शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.याप्रसंगी पत्रकार एस.के.गायकवाड यांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
  

प्रारंभी स्त्री शिक्षणाच्या प्रनेत्या क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी जेष्ठ कार्यकर्ते शिवाजी मिटकर गुरुजी, शालेय व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष रामसिंग परिहार,  सदस्य भालचंद्र यादव, विश्वानाथ मिटकर, दत्ता आण्णा सुरवसे, योगेश सुरवसे, तानाजी वचने,तात्या चव्हाण, विश्वनाथ पाटील,मदजरोदीन शेख,दिपक वाघमारे, भारत वाघमारे, आशा कार्यकर्ती पार्वती बिराजदार, कोमल झेंडारे, मुक्ताबाई वाघमारे आदीसह पालक विद्यार्थी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन सहशिक्षक तानाजी लोहार यांनी केले तर आभार  मुख्याध्यापिका महादेवी जत्ते यांनी केले.
 
Top