माधवराव पाटील महाविद्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी
मुरूम, ता. उमरगा, दि.०८
येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती विविध कार्यक्रमाने शनिवारी रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी सहाय्यक पोलीस निरीक्षक पवनकुमार इंगळे व प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र पत्रकार संघ, जिल्हा उस्मानाबाद व श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी पवनकुमार इंगळे म्हणाले की, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांची भूमिका देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असून त्यांनी निर्भीडपणे पत्रकारिता जोपासावी. त्यामुळे भारतीय लोकशाही समृद्ध होईल, असे गौरवउद्गार काढून पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांनी पत्रकार दिनाचे महत्त्व प्रतिपादन करताना पत्रकार हा देशाचा कणा आहे. त्यांच्या लेखणीतून समाज प्रबोधन करून देशहित, राष्ट्रप्रेम जपले पाहिजे. अन्यायाला वाचा फोडण्याचे काम पत्रकारांची लेखणीच्या माध्यमातून करावे, असा मौलिक संदेश त्यांनी यावेळी दिला.
यावेळी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, प्रा. डॉ. सतिश शेळके, माजी प्राचार्य सच्चिदानंद अंबर, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, पोकॉ. खंडेराव होळकर, डॉ. विनायक रासुरे, डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, डॉ. मुकुंद धुळेकर, डॉ. सुशिल मठपती, डॉ. राम बजगिरे, डॉ. नागनाथ बनसोडे, डॉ. सुजित मटकरी, डॉ. राजकुमार देवशेट्टे, डॉ. राजू शेख, प्रा. प्रियंका काजळे, प्रा. विवेक चौधरी, महाराष्ट्र पत्रकार संघाचे मराठवाडा कार्यकारिणी सदस्य प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, माजी तालुकाध्यक्ष बालाजी व्हनाजे, कार्यालयीन अधिक्षक राजू ढगे, अशोक कलशेट्टी, दत्तू गडवे, सुभाष पालापुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी जेवळीचे पत्रकार सुधीर कोरे यांना नुकताच महात्मा ज्योतिबा फुले स्मृती ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा पवनकुमार इंगळे यांच्या हस्ते शाल, वैचारिक ग्रंथ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विविध शाखेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना वैचारिक ग्रंथाचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले. अचलेरचे पत्रकार जगदीश सुरवसे, भीमाशंकर पांचाळ, नामदेव भोसले, सुभाष गायकवाड, मनोज हावळे, अमोल कटके, किशोर कारभारी, अजिंक्य राठोड आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शिवपुत्र कानडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार डॉ. प्रतापसिंग राजपूत यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
फोटो ओळ : मुरुम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन वैचारिक पुस्तके वाटप करताना पवनकुमार इंगळे अशोक सपाटे, चंद्रकांत बिराजदार, सतिश शेळके, सच्चिदानंद अंबर, महेश मोटे व सर्व पत्रकार बांधव, कर्मचारी वृंदासह उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनी.