नळदुर्ग,दि.०८
 
तिसरे अपत्य जन्माला घालून केंद्रशासन व राज्य शासनाच्या आदेशाचे अवमान करणाऱ्या नळदुर्ग नगरपरिषद कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी अन्याय , अत्याचार विरोधी समिती अल्पसंख्यांक विभाग धाराशिव शाखा नळदुर्गचे अध्यक्ष सय्यद अजिज फजल यानी संचालक नगरपरिषद संचनालय मुबंई,  धाराशिव जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी न.प. नळदुर्ग यांच्याकडे दि.०८ जानेवारी रोजी निवेदनाव्दारे केली आहे.

निवेदनात पुढे नमुद केले आहे की, माहिती अधिकारात नगरपरिषद कार्यालय नळदुर्ग येथील कर्मचारीबाबत  तिसरे अपत्य असल्याची माहिती मागविली होती. त्यानुसार संबंधित कार्यालयाकडून मला माहिती प्राप्त झाली. पाठविलेल्या माहितीमध्ये असे निदर्शनास आले आहे की, केंद्र शासन व राज्य शासनाच्या लहान कुटुंब या आदेशाला संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी केराची टोपली दाखवत तिसरे मुल जन्माला घातले आहे. तर काही कर्मचारी यांनी दुसरे लग्न करून दोन दोन अपत्य जन्माला घातलेले आहेत. याची देखील चौकशी होणे आवश्यक आहे. हे कर्मचारी आपले तिसरे मूल असल्याची माहिती दडवून ठेवलेली आहे. हे नियमबाह्य असून शासनाचा आदेशाचे उल्लंघन केलेले आहे. शासनाने लहान कुटुंब नियमाचे वेळोवेळी आदेश काढून देखील संबंधित शासकीय अधिकारी कर्मचारी शासनाचे नियम  धाब्यावर बसवत आहेत.  सर्व सामान्यांना देखील नियम केले आहे. जर सुशिक्षित अधिकारी कर्मचारीच जर आदेशाचे पालन करत नसेल तर सर्व सामान्यांचे काय? असा प्रश्न करुन पुढे म्हटले आहे की,  सबंधित कर्मचारी यांच्या नावाच्या यादीतील अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ बडतर्फ करून त्यांच्यावर  शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी  फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी सय्यद अजिज फजलयांनी केली आहे.


 
Top