नळदुर्ग,दि.०१
नियोजित नळदुर्ग तालुका निर्मितीसह अनेक रखडत पडलेल्या महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी पुढाकार घेतल्यास सर्व राजकीय मतभेद बाजूला सारुन शहराच्या विकासासाठी त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार आसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारणी सदस्य अशोक जगदाळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
नळदुर्ग शहरातील प्रलंबित प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी व ते तात्काळ सोडवुन शहराचा विकास करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक जगदाळे यांनी नळदुर्ग येथे पत्रकार परिषदेत आयोजित केली होती. यावेळी जगदाळे पुढे म्हणाले की, शहरातील महत्वाचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित आहेत. आजपर्यंत हे प्रश्न सुटले नाहीत. म्हणून शहराचा विकास होऊ शकला नाही. शहरात रोजगाराच्या एकही साधन उपलब्ध नसल्याने शहरातील बेरोजगार युवकांची संख्या वाढत चालली आहे. आजपर्यंत लोकप्रतिनिधीनी हे प्रश्न का सोडवले नाहीत हा एक यक्ष प्रश्न आहे. ज्यांनी 25 वर्षे सत्तेत घालविले त्यानीही नळदुर्ग शहराचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी काय प्रयत्न केले. असा प्रश्न जगदाळे यांनी उपस्थित केला. नळदुर्ग तालुका निमिर्ती, शहरात औद्योगिक वसाहत निर्माण करणे, अप्पर तहसील कार्यालय सुरू करणे, स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करणे हे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. केवळ हे प्रश्न सुटले नाहीत म्हणून शहराचा विकास होऊ शकला नाही असेही त्यानी म्हटले आहे.
मागील सर्व विसरून नळदुर्ग शहराचे हे महत्त्वाचे प्रलंबित प्रश्न आहेत. हे सोडवण्यासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकदिलाने काम करण्याची आज गरज आहे. नळदुर्ग तालुका निमिर्तीसाठी अन्य महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी माजी मंत्री चव्हाण यांनी पुढाकार घ्यावा. तसेच यासाठी होणाऱ्या आंदोलनाचे नेतृत्व त्यानी केला तर केवळ शहर विकासासाठी मी त्यांच्या पाठीशी उभे राहीन असे जगदाळे यांनी म्हटले आहे.
नळदुर्ग शहराचा विकास आजपर्यंत होऊ शकला नाही यासाठी ते प्रश्न सोडवण्यासाठी मी एक पाऊल मागे घेऊन जे कोणी हे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतील त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहणार असल्याचेही सांगितले.