नळदुर्ग : नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या  बोरीनदी काठावरील युनिवंडर्स रिसॉर्ट अँन्ड थीम पार्क

नळदुर्ग दि .०१
सोलापूर -हैद्राबाद महामार्गावरील  नळदुर्ग हे ऐतिहासिक शहर आहे.  काळानुरुप बदलत चाललेल्या जिवनशैलीचा  विचार करत विविध समारंभ, विवाहा सोहळा, व पर्यटकासाठी आजच्या  धकाधकीच्या जिवनात शांत व आकर्षक  निसर्गाने बहरलेल्या नळदुर्ग शहराच्या उत्तरेस भुईकोट किल्ल्याशेजारी , बोरीनदी काठावर युनिटी कंपनीने  युनिवंडर्स रिसॉर्ट अँन्ड थीम पार्क गेल्या काही वर्षापुर्वी निर्माण  केले आहे. विविध कार्यक्रम साजरा करण्याकरिता निसर्गप्रेमी नागरिक व पर्यटक बहुसंख्येनी याठिकाणी भेट देवुन मनमुराद आनंद लुटताना दिसुन येत आहे.


  नळदुर्ग  येथिल भुईकोट किल्ला हा इतिहास प्रसिध्द  किल्ला असुन  शासनाकडुन युनिटि मल्टिकॉन्स कंपनीने जतन व संगोपनाकरिता घेऊन किल्ल्याचे रुपडे पालटले  आहे. किल्ला पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील शाळा ,काॕलेजमधील विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. नळदुर्ग शहराच्या उत्तरेस बोरी नदीच्या काठावर युनिवंडर्स रिसॉर्ट अँन्ड थीम पार्क बनविलेले आहे. याठिकाणी  सर्व सोयीनियुक्त रिसॉर्ट रायफल शुटिंग, क्रिकेट, बैलगाडी स्वारी, स्वीमिंग पुल, रेन डान्स, फिल्म शुटिंग, शॉर्ट फिल्म शुटिंग, लग्न समारंभासाठी उत्तम आणि सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. ओव्हर नाईट कॅम्पिग, एक दिवसीय सहल, वाढदिवस, लग्न समारंभ, कॉर्पोरेट कॉन्फरन्स अँन्ड इव्हेंटस, प्रि वेडिंग शुटिंग,  शैक्षणिक सहलीसाठी उत्तम सोय करण्यात आली आहे.

या रिसॉर्टच्या माध्यमातून नळदुर्ग येथील (मैलारपुर) श्री खंडोबा मंदिर, तीर्थक्षेत्र रामतीर्थ, त्याचबरोबर अक्कलकोट, गाणगापुर, तुळजापुर, शिर्डी, पंढरपुर,   
दर्शनासाठी जाणाऱ्या भाविक, पर्यटकांना या रिसॉर्टची मदत होत आहे. रिसॉर्ट ही एक स्वयंपूर्ण व्यावसायिक आस्थापना आहे. जी सुट्टीतील व्यक्तींच्या बहुतेक गरजा, जसे की अन्न, पेय, पोहणे, निवास, खेळ, मनोरंजन व आधिका आधिक दर्जेदार सुविधा  या परिसरात पुरवण्यासाठी प्रयत्नशिल आसल्याचे युनिटी कंपनीचे मुख्य संचालक कफिल मौलवी , संचालक जयधवल करमरकर, संचालिका वैशालीताई जैन यानी सांगितले. 


श्री  स्वामी समर्थ महाराजांचे स्थान म्हणुन अक्कलकोट प्रसिध्द आहे. अक्कलकोट शहर नळदुर्ग पासून ३२ कि. मी अंतरावर वसलेले आहे. श्री. तुळजाभवानी देवीचे मंदिर नळदुर्ग पासुन ३२ कि.मी वर आहे. तर सोलापूर ४५ कि.मी वर आहे.

 नळदुर्गचा युनिवंडर्स रिसॉर्ट अँन्ड थीम पार्कचा निसर्गरम्य परिसर आणि मनमोहक दृश्य निसर्ग प्रेमीना आकर्षित करीत आहे. याच पॉईंटवरून नळदुर्गचा भुईकोट किल्ला पाहताना इतिहासाची आठवण होते. याठिकाणी एका चिञपटाचे चिञकरणही करण्यात आले आहे.

         
नळदुर्ग  : युनिवंडर्स रिसॉर्ट अँन्ड थीम पार्क     
 बुकिंगसाठी संपर्क :- मो- 8007700558, 0217- 2605051
 
Top