सोमवार दि.२६  रोजी धाराशिव येथे रिपाइं (आठवले)च्या जिल्हा मेळाव्याचे आयोजन 

नळदुर्ग,दि.२५  एस.के.गायकवाड

रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) धाराशिव जिल्हा शाखेच्या वतीने सोमवार दि.२६ फेब्रुवारी २०२४ रोजी रिपाइंच्या जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
 
रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे सामाजिक न्याय व आधिकारीता राज्य मंत्री भारत सरकार ना. रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत धाराशिव (उस्मानाबाद) येथिल छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक नाट्य सभागृहात दुपारी ठिक १२.३० वा.दरम्यान आंबेडकरी चळवळीतील लढवय्या पँथर कालकथीत (दिवंगत) यशपाल सरवदे यांच्या प्रथम स्मृती दिनाच्या निमित्ताने आभिवादन व स्मरनिका प्रकाशन आणि रिपाइंच्या जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश जाँइंट सेक्रेटरी राजाभाऊ ओहाळ हे राहणार आहेत तर प्रमुख आथिती म्हणून रिपाइंचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, धाराशिव जिल्ह्याचे पालक मंत्री ना. तानाजी सावंत, तुळजापूर विधानसभेचे आमदार राणाजगजितसिंह पाटील (राणा दादा),उमरगा-लोहार विधान सभेचे आमदार ज्ञानराज चौगुले, आदी उपस्थित राहणार असून या मेळाव्यात अगामी होऊ घातलेल्या लोक सभा,विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका व विविध महत्त्वपुर्ण विषयावर चर्चा करून समाजहिताच्या द्रष्टीने महत्त्वाचे ठरावा घेण्यात येणार आहेत. 
  
तरी धराशिव जिल्ह्यातील  रिपब्लिकन कार्यकर्ते, पदाधिकारी व पँथर चळवळीतील कार्यकर्ते पदाधिकारी व तसेच आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रिपाइं (आठवले) जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

दि.२६ रोजी दुपारी .धाराशिव  येथे ना.रामदास आठवले  यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) पक्षाच्या जिल्हा मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याच्या प्रचारार्थ नळदुर्ग येथे  वाँलपोस्टर लावताना कार्यकर्ते
 
Top