तुळजापूरात संत रविदास जयंती निमित्त रिपाइं (आठवले) तर्फे आभिवादन

तुळजापूर ,दि.२५ एस.के.गायकवाड

संत शिरोमणी गुरु रविदास जयंती निमित्त रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) तुळजापूर शहर शाखेच्या वतीने त्यांना आभिवादन करण्यात आले.


दि.२४ रोजी संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या ६४७ व्या जयंती निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तुळजापूर तालुका व शहर शाखेच्या वतीने रोहिदास नगर भवानी रोड येथे प.पु.संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पुजन करून आभिवादन करण्यात आले.


याप्रसंगी रिपाइं जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, तुळजापूर विधानसभा अध्यक्ष प्रकाश कदम, रिपाइं तुळजापूर शहराध्यक्ष आरुण कदम‌‌‌, युवा आघाडी शहराध्यक्ष अमोल कदम, कामगार आघाडी तालुका अध्यक्ष आप्पा कदम,युवा आघाडी शहर सरचिटणीस अतिश कदम,रिपाइं मराठा समाज आघाडी तालुका अध्यक्ष नागनाथ गाडे, रिपाइंचे भैरु कदम,रवी  वाघमारे, उमेश सिध्दगणेश आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top