तुळजापूर : निवडणूक प्रमुखपदी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख यांची निवड
काटी/उमाजी गायकवाड
आगामी 2024 मध्ये महाराष्ट्रात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर विधानसभा मतदारसंघासाठी तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रहिवासी तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख यांची तुळजापूर विधानसभा निवडणुक प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहीचे निवडीचे पत्र रविवार दि. 4 रोजी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. पक्षाने त्यांच्यावर नव्याने आणखी एक जबाबदारी सोपवल्याने त्यांच्या निवडीचे तुळजापूर तालुका भाजपच्या वतीने स्वागत होत आहे.
राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखांची यादी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच जाहीर केली. या यादीत भाजप नेतृत्वाने भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख यांच्यावर तुळजापूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे. विक्रमसिंह देशमुख यांनी भाजपचे जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्यापासून व त्यापुर्वीही भाजपचे कार्य करीत असताना भाजपचे नेतेमंडळी, पदाधिकारी, आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षनिष्ठेने भाजप पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. त्यांची पक्षावर असलेली निष्ठा, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची पद्धत, संघटन कौशल्य, व आजवर पक्षासाठी केलेल्या कामाची दखल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची तुळजापूर विधानसभा निवडणुक प्रमुखपदी निवड केली आहे. त्यामुळे विक्रमसिंह देशमुख जबाबदारी वाढली आहे.
विक्रमसिंह देशमुख
वरिष्ठ भाजप नेतृत्वाने काटीसारख्या ग्रामीण भागातील माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास दाखवून भाजपच्या विविध पदांवर काम करण्याची संधी दिली. ज्या ज्या पदावर मला काम करण्याची संधी दिली ती निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न केला. जुन्या नव्या पदाधिकाऱ्यांसमवेत भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष पदावर काम करीत असताना पार्टीने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुखपदी आणखी एक जबाबदारी देऊन माझ्यावर जो विश्वास दाखवला तो विश्वास आगामी 2024 च्या तुळजापूर विधानसभा निवडणुकीत सार्थ ठरविणार
यावेळी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील ॲड. मिलिंद पाटील, भाजपचे जिल्हा सरचिटणीस दिपक आलुरे, जिल्हा मजूर फेडरेशन चेअरमन नारायण नन्नवरे, तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, गुलचंद व्यवहारे,आदेश कोळी,मकरंद देशमुख, अनिल गुंड,अतुल सराफ,दादा बेग,हेरार काझी, दत्ता सोनवणे,संजय महापूरे, अमोल देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.