अणदूर येथे लिंबराज सुरवसे यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार
वागदरी,दि.४ : एस.के.गायकवाड
सराटी ता.तुळजापूर येथील बुध्द फुले शाहू आंबेडकर चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते तथा जवाहर विद्यालय अणदूर ता.तुळजापूर येथील सहशिक्षक लिंबराज तुळशीराम सुरवसे यांचा सेवानिवृत्तीबद्दल अणदूर येथील हुतात्मा स्मारक सभाग्रहात भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
लिंबराज सुरवसे गुरुजी यांनी तब्बल ३३ वर्षे जवाहर विद्यालय अणदूर येथे अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने विद्यार्थी घडविण्याचे कार्य केले आहे.नौकरी करत करत त्यांनी बामसेफ कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या आडीआडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने परिसरात गावागावांत जावून समाज प्रबोधनाचे काम केले आणि करीत आहेत. अखिल भारतीय साने गुरुजी कथा माला शाखा अणदूरचे पदाधिकारी म्हणून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
स्वकर्तुत्वाने एक उपक्रमशिल,विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली असून ते नुकतेच शिक्षकियसेवेतून सेवानिव्रत झाले आहेत. त्यांच्या सेवा निव्रत्तीनिमित्ताने जवाहर परिवार व अखिल भारतीय साने गुरुजी कथा मला शाखा अणदूर व मित्रपरिवारांच्या वतीने त्यांच्या नागरी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अध्यक्ष डी.के.कुलकर्णी, सरपंच रामचंद्र अलुरे, प्राचार्य उमाकांत चनशेट्टी, प्राचार्य कमलाकर कांबळे, उपजिल्हाधिकारी अविनाश कांबळे (जालना),माजी धाराशिव जि.प.अध्यक्ष शिवदास कांबळे आदी होते.
प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व शिक्षण महर्षी दिवंगत सि.ना.अलुरे गुरुजी यांच्या प्रतिमांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुजन करून सेवानिवृत्त शिक्षक लिंबराज सुरवसे गुरूजी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी मराठवाडा शिक्षक संघाचे सूर्यकांत विश्वासराव,राज्य माध्यमिक शिक्षण महामंडळाचे व्ही.जी.पवार,मुख्याध्यापक संघाचे सुरेश टेकाळे, मुख्याध्यापक सुरेश ठोंबरे,सानेगुरुजी कथा मालेचे सुनील पुजारी,मारुती खोबरे गुरुजी, चंद्रशेखर कंदले, प्रा.सुभाष स्वामी, सातप्पा व्हलदुरे, संजय घंटे,व्ही.डी.पाटील, गोपाळ कुलकर्णी, मकरंद पाटील, सामाजिक कार्यकर्ते
डॉ.सुरेश कोरे,प्रबोध कांबळे, आर.एस.गायकवाड, कैलास गवळी गुरुजी, एस.के.गायकवाड,
प्रा.डॉ. महादेव गायकवाड पत्रकार राजेंद्र स्वामी सह जवाहर परिवारातील सर्व मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव मारुती बनसोडे यांनी केले तर सुत्रसंचलन प्रा.एम.बी.बिराजदार यांनी केले व सन्मान पत्राचे वाचन आणि आभार प्रदर्शन शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष भैरवनाथ कानडे यांनी केले.