कौटुंबिक समस्यांचे निराकारणासाठी गृहणीनी आध्यात्मिक विचाराची कास धरण्याचे  ब्रह्माकुमारी उज्वला बहेनजी यांचे आवाहन

धाराशिव, दि.१३

 रोजच्या जीवनातील कौटुंबिक  समस्यांचे निराकारण करण्यासाठी  गृहणिनी आध्यात्मिक  विचाराद्वारे  स्वतः मध्ये बदल  घडवून कुटूंबाला समस्या  मुक्त,  तणाव मुक्त बनविने ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन  पंढरपुर सेवाकेंद्राच्या  संचालिका ब्रम्हाकुमारी उज्वला बहेनजी  यानी "पारिवारिक समस्या व समाधान" या विषयावर धाराशिव येथे  बोलताना केले.  

सोमवार रोजी हिळदी कुंकू कार्यक्रम व पारिवारिक समस्या व समाधान या विषयावर व्याख्यान ब्रम्हाकुमारी वैष्णवी बहेनजी व सर्व तांबरी विभाग ईश्वरी परिवार यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. 

 या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन डॉ.मंजुळा पाटील, डॉ.अस्मिता बुरगुटे, धारशिव अनंदनगर सेवा केंद्राच्या संचालिका ब्र.कु.ज्योती दिदि, पंढरपुरच्या ब्र.कु.स्वाती बहेनजी, माढा उपसेवा केंद्राच्या ब्र.कु.दुर्गा बहेनजी, ब्र.कु.कृष्णा बहेनजी, अदि उपस्थित होत्या. 

उज्वला बहेनजी  पुढे म्हणाल्या कि, नारी शक्ति चा पारंपारीक  इतिहास पाहिला तर नारीला शक्ती स्वरूपात पूजन केले जाते. नारी शक्तीमध्ये सहनशिलता  समावून घेण्याची शक्ती उपजतच असल्यामुळे तणावग्रस्त जरी झाली, तरी पुरुषा प्रमाणे व्यसनाधिन कधीच होत नाही.  परमात्मानेही नारी शक्तीद्वारे विश्वपरिर्वतनाचे कार्य सुरु केले. छत्रपती शिवाजी महाराज यानी भवानी मातेकडून दिव्य शक्ति प्राप्त केली. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा महत्वाचा वाटा असतो . वर्तमान समयी नारीने आपली सक्ती ओळखली तर अद्वितीय कार्य करू शकते असेही त्यानी सांगितले. नंतर त्यानी हळदी कुंकूचे आध्यात्मिक रहस्य काय ते स्पष्ट केले . आपले मनोबल वाढविण्यासाठी राजयोगाचा अभ्यास कसा करायचा हे प्रात्याक्षिक करुन दाखवले. 

 डॉ. आस्मिता  बुरुगुटे यानी स्वतःला या ठिकाणी येवुन आध्यात्मिक व सकारात्मक उर्जाची अनुभूती  मिळाल्याचे सांगुन आध्यामिक शक्तिचा अनुभव झाल्याचे सांगितले. डॉ मंजुळा पाटील यानीही आपले विचार व्यक्त केले.  विद्यानगर पोस्ट ऑफिसच्या  महिला कर्मचारी पुरंदरे  यांचा कृषी प्रदर्शनात  पाक कलेमध्ये ज्वारीची बर्फी तयार केल्याने पाककलेचे प्रथम पारितोषीक  पटकावले.   त्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. 

कार्यक्रमाची सुरुवात अध्यात्मिक गीताने व उद्घाटन दिप प्रज्वलनाने झाले. माढा सेवा केंद्राच्या उपसंचालिका ब्रह्माकुमारी दुर्गा  बहेनजी यांनी सर्व उपस्थित माता-भगिनीकडून नारी शक्तीकरणाचे नारे वदवून घेतले. तसेच सर्वांकडून प्रतिज्ञाही करून घेतली. 

 याप्रसंगी तांबरी सेवा केंद्राच्या उपसंचालिका ब्रह्माकुमारी वैष्णवी बहेनजी यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. तसेच उज्वला बहेनजी यांच्या हस्ते सर्व पाहुण्यांना ईश्वरीय भेट म्हणून लक्ष्मी नारायणाची प्रतिमा देण्यात आली. याप्रसंगी ज्योती बहेनजी, कृष्णा बहेनजी, आनंदनगर सेवाकेंद्र तसेच तांबरी  विभाग व शहरातील अनेक प्रतिष्ठित  महिला उपस्थित होत्या. निवृत्त सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष बेडगे,  पत्रकार  शिवाजी नाईक , नळदुर्ग  येथील माता भगिनी या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. तसेच प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या अनेक माता-भगिनी ही यावेळी उपस्थित होत्या. यावेळी ब्रह्माकुमार सुरेश जगदाळे यांनी व्यसनमुक्ती विषयक मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाचे सांगता ईश्वरीय गीताने झाली. सुमारे 200 ते 250 महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

नारी जागृती महान कार्यात अग्रेसर असणारी संस्था म्हणजे प्रजापिता ब्र.कु.ईश्वरीय विश्वविद्यालय व राज योग शिक्षण आणि शोध प्रतिष्ठाणच्या महिला प्रभाग या संस्थेची स्थापना १९३७ साली निराकार शिवपरमात्म्याने पिताश्री ब्रम्हाव्दारे केली. विश्वातील दहा हजार सेवा केंद्रामध्ये ९ लाख बंधु भगीनी या ज्ञानाचा नियमित लाभ घेत आहेत विशेष म्हणजे या संस्थेचे संचालन महिला व्दारे होते. या संस्थेला संयुक्त् राष्ट्र संघाचे गैरशासकिय सभासदत्व् मिळाले आहे. आणि शांतीच्या क्षेत्रातील उल्लेखनिय कार्य बद्दल शांती दुत पुरस्कार मिळाला आहे. महिला प्रभागाव्दारे नारी शक्ती हि त्रेमासकि समाचार पत्रिका प्रकाशीत केली जाते. महिलांच्या उन्नतीसाठी या संस्थेव्दारे पारिवारीक मुल्यांचे प्रशिक्षण, सकारात्म्क चिंतन पाठयक्रम, संमेलन संगोष्ठी, योग शिबीराव्दारे तनावमुक्ती आदि मोफत उपक्रम राबिवले जातात.
 
Top