नळदुर्ग ते अक्कलकोट रस्त्याचे रखडलेले काम त्वरित पुर्ण करा : रिपाइंची मागणी

वागदरी ,दि.१२


गेल्या चार पाच वर्षांपासून नळदुर्ग ते अक्कलकोट या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५२ चे रखडलेले काम त्वरित पुर्ण कराण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) शहर शाखा नळदुर्ग ता.तुळजापूरच्या वतीने या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यामध्ये बेशरमाची व कडुलिंबाची झाडे लावून आंदोलन करून शासनाकडे करण्यात आली आहे.

  रस्ता सुरक्षा सप्ताह आभियानाचे औचित्य साधून नळदुर्ग ते अक्कलकोट या असुरक्षित रस्त्यावर (गणेशखिळा) गणेश मंदिराच्या जवळच अंतरावर रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) नळदुर्ग शहर शाखेच्या वतीने या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यात बेशरमाची व कडुलिंबाची झाडे लावून  प्रशासनाचा निषेध करत नळदुर्ग ते अक्कलकोट रोडचे प्रलंबित काम त्वरीत पुर्ण करून हा रस्ता पावसाळा सुरु होण्यापूर्वी सुरक्षित करून द्यावा अशी मागणी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी  केली आहे.
  

याप्रसंगी रिपाइं (आठवले) चे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, रिपाइं सोलापूर जिल्हा संघटन सचिव सोपान गायकवाड,  नळदुर्ग शहराध्यक्ष मारुती खारवे, अल्पसंख्याक आघाडीचे तालुका अध्यक्ष बाशिद कुरेशी, दलित पँथरचे जिल्हा संपर्क प्रमुख शामकांत नागीले, तालुका संघटक सुरेश लोंढे,मेडिया सेलचे तालुका अध्यक्ष प्रकाश गायकवाड,रिपाइंचे दत्ता बनसोडे,मारूती लोंढे, संतोष झेंडारे, भटक्या विमुक्त संघनेचे संस्थापक पंडित भोसले,आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी बंजारा क्रांती दलाचे प्रदेश कार्याध्यक्ष विद्यानंद राठोड व जिल्हा अध्यक्ष निरंजन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बंजारा क्रांती दलाचे महेंद्र चव्हाण, अकाश आडे,मिथुन राठोड,संदीप राठोड आदीनी या रिपाइंच्या आंदोलनास पाठिंबा दिला.
 
Top