वागदरी ग्राम पंचायतीच्या उपसरपंच पदाची निवड कधी होणार ? : उपसरपंचपदी कोणाची वर्णी लागणार ग्रामस्थात उत्सुकता

वागदरी (एस.के.गायकवाड)


विद्यामान उपसरपंच मिनाक्षी महादेव बिराजदार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या तुळजापूर तालुक्यातील वागदरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवड कधी होणार व उप सरपंचपदी कोणाची वर्णी लागणार ? याची उत्सुकता येथील ग्रामस्थामध्ये वाढीस लागली आहे.

  अक्टोबर-नोव्हेंबर २०२२ मध्ये तुळजापूर तालुक्यातील वागदरी ग्रामपंचयतीची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक होऊन जनतेतून लोकनियुक्त सरपंच म्हणून तेजाबाई शिवाजी मिटकर ह्या विजयी झाल्या तर ग्रा.प. सदस्यामधून मिनाक्षी महादेव बिरादार यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली होती.पँनलमध्ये ठरलेल्या प्रमाणे तांत्रिक आडचणीमुळे मिनाक्षी बिराजदार यांनी  दि.१ जानेवारी २०२४ रोजी आपल्या उप सरपंच पदाचा राजीनामा दिला आहे. तो राजीनामा मंजूर ही करण्यात आला आहे.राजीनामा देऊन दोन महिने उलटत आहेत. त्यामुळे दिवसेनदिवस वागदरीच्या उप सरपंचपदाची निवड कधी होणार,उप सरपंच पदी कोणाची वर्णी लागणार संबंधित निवडणूक विभागाला वागदरीच्या उपसरपंच पदाच्या निवडणूकीचा मुहूर्त कधी सापडणार याची उत्सुकता येथील ग्रामस्थाना लागली आहे.
 
Top