नळदुर्ग तालुका निर्मितीसाठी ठराव घ्यावा-मनसेचे ग्रामपंचायत यांना पत्र

नळदुर्ग ,दि.२४

गेल्या चाळीस वर्षांपासूनची मागणी असलेल्या नियोजित  नळदुर्ग तालुका विषय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हातात घेऊन वेगवेगळ्या माध्यमातून सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. राज्य शासनाने 2 मार्च 2023 रोजी राज्यात 49 नवीन तालुके निर्मिती करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे,सद्या या समितीचे कामकाज सुरु असून कोणत्याही क्षणी शासनाकडे अहवाल सुपूर्द करून नवीन तालुके निर्मितीची शिफारस करू शकते,त्याच अनुषंगाने मनसेने पंधरा दिवसापूर्वी 25 पानी अहवाल कोकण विभागीय आयुक्त,नवी मुंबई यांच्या कार्यालयात पाठविला.


आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना संकल्पित नळदुर्ग तालुका निर्मिती बाबत तब्बल 125 पानी सुधारीत अहवाल समिती समोर प्रत्यक्ष भेटून सादर करण्यासाठी मनसेचे  तयार करत आहेत, त्याच अनुषंगाने नळदुर्ग शहराच्या हद्दीतील 46 ग्रामपंचायती व 10 ग्रुप ग्रामपंचायतीकडे बहुमताने ठराव घेण्यासाठी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी यांनी विनंती पत्र देण्यासाठी मनसेच्या तीन तुकड्या तयार केल्या आहेत,यामध्ये मनविसेचे गणेश बिराजदार,सोमेश्वर आलूरे, विहार सुरवसे ,किरण चव्हाण, गणेश भोसले, नागेश गायकवाड, रामानंद रिंगणे,आकाश पटणे हे प्रत्येक ग्रामपंचायतला भेटून विनंती पत्र देत आहेत, बऱ्याच ग्रामपंचायतने बहुमताने ठराव पास करून मनसेच्या पदाधिका-याकडे ठरावाची प्रत दिल्या आहेत, 

मनसेने दिलेल्या विनंती पत्रावर जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार,शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर संघटक रवि राठोड,शहर उपाध्यक्ष रमेश घोडके,मनविसे तालूकाध्यक्ष सूरज चव्हाण,ता.उपाध्यक्ष गणेश बिराजदार यांच्या स्वाक्षरी आहेत.
 
Top