सहशिक्षिका  कविता पुदाले - उकंडे याना पुणेच्या  वृंदावन फाऊंडेशनचा "जनाई मुक्ताई समाज भुषण पुरस्कार" जाहिर

नळदुर्ग ,दि.२४

शहरातील जि.प. प्रशालेच्या सहशिक्षिका  कविता पुदाले - उकंडे याना पुणे येथिल  वृंदावन फाऊंडेशनचा
"जनाई मुक्ताई समाज भुषण पुरस्कार" जाहिर झाला असुन हा पुरस्कार दि.३ मार्च रोजी पुणे येथे प्रदान करण्यात येणार आहे.

वृंदावन फाऊंडेशन पुणे अध्यक्ष सचिन पाटील यांच्या वतीने दिला जाणारा आरोग्य , कला, क्रिडा पर्यावरण , विकास संस्कृती ,साहित्य समाजकरण महिला सबलीकरण इत्यादी परिघात अतुलनीय कार्य करत असणाऱ्या भगिनींचा जनाई मुक्ताई समाज भुषण पुरस्कार देऊन प्रतिवर्षी गौरव  करण्यात येतो.

 कविता पुदाले -उकंडे यांना पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल हभप दिपक महाराज खरात ,श्यामराव दहिटणकर , प्रा . सोमनाथ लांडगे ,हभप  ईश्वर महाराज कुंभार, श्रीकृष्ण देशमुख, राजेंद्र लोहार,  सोमनाथ लांडगे,जगताप, सुनिल उकंडे,,  रुपाली डुकरे, अर्चनाताई डुकरे, मिरा महाबोले, मंगल सुरवसे,  शांता ठाकूर, माधुरी घोडके, ललिता दासकर, कोमल बेले आदीनी आभिनंदन केले आहे.
 
Top