खुंटेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी जाधव तर उपाध्यक्षपदी सौ. गरड यांची निवड
काटी/प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी समाधान जाधव तर उपाध्यक्षपदी सौ.अनिता गरड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक घोडके यांच्या अध्यक्षतेखाली व सरपंच पती तथा शिक्षणतज्ज्ञ महादेव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत 2024-25 या शैक्षणिक वर्षातील पहिली पालक सभा शनिवार दि. 24 रोजी सकाळी आयोजित करण्यात आली होती. या सभेत विविध समित्या गठित करण्यात आल्या.
यावेळी 2024-25 ते 2025-26 या दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी समाधान जाधव तर उपाध्यक्षपदी सौ. अनिता गरड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीत सौ . कौशल्या जाधव, सौ . मिना जादा, सौ. रोहिणी कदम, सौ. छाया बिडबाग, शशिकांत जाधव, तानाजी जाधव, शिक्षणतज्ज्ञ महादेव जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी खुंटेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा, माता-पालक व ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचे अभिनंदन करुन सत्कार करण्यात आला.
यावेळी नूतन अध्यक्ष समाधान जाधव यांनी सर्वांच्या सहकार्याने शाळेच्या विकासासाठी आदर्शवत काम करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी मुख्याध्यापक घोडके, सहशिक्षिका शोभा राऊत, शिक्षणतज्ज्ञ महादेव जाधव यांच्यासह नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, ग्रामस्थ उपस्थित होते.