रमाईचे जीवन म्हणजे एक महाकाव्य होय : प्रा.डी.डी.मस्के
वागदरी,दि.०८ (एस.के.गायकवाड)
त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांचे जिवन म्हणजे एक महाकाव्य होय असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ विचारवंत प्रा.डी.डी.मस्के यांनी बार्शी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
दि ७ फेब्रुवारी२०२४ रोजी नालंदा बुद्ध विहार बार्शी (जिल्हा सोलापूर ) येथे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची १२६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ धम्मसेविका पुष्पा ओमन ह्या होत्या तर प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा.डी.डी.मस्के हे होते.
या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना त्यांनी माता रमाईचा त्याग सांगून सामर्थ्यवान,प्रेरणादायी,समर्थ साथ देणारी, संसार सांभाळणारी, कष्टाळू, आदर्श माता, आदर्श बहीण, आदर्श सून, आदर्श सहचारिणी, कुटुंबवत्सल असे रमाईचे गुण वैशिष्ट्ये दिसून येतात. यावरून रमाईचे जीवन म्हणजे एक महाकाव्य होय असे विचार व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की
या महामातेंनं महासूर्याचा संसार चालवताना रमा भीमाच्या दिव्याची वात झाली. हा दिवा न विझणारा, अन वातही न संपणारी आहे. हा दिवा सतत तेवत ठेवण्याची जबाबदारी सर्व बहुजन बांधवाची आहे.
रमाईच्या चारित्र्यातून बहुजनासाठी संयम, श्रमसंस्कार, प्रामाणिकपणा, स्वाभिमान हे गुण दिसून येतात. तरी त्यांचा विचारांचा आपण सर्वांनी अंगीकार केला पाहिजे. असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास निवृत्त शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे, प्रा.ए.बी. विद्यागर,भीमराव कदम ,नागनाथ सोनवणे ,रमेश निकुंबे, अस्तम चंदनशिवे,प्रा.अशोक वाघमारे, बुध्दसेवा ट्रस्टच्या सर्व सदस्या, नालंदा बुधविहाराच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या.
यावेळी बुध्दसेवा ट्रस्टच्या पुष्पा ओमन, सुजाता गायकवाड, शोभा मोरे,शैल कांबळे, जनाबाई लोकरे, तसेच शिवशक्ती अर्बन बँकेचे नवनियुक्त व्हाईस चेअरमन प्रा.अशोक वाघमारे, तुळजापूर नगरपालिकेचे उपमुख्यधिकारी रणजित कांबळे, बार्शी पंचायत समितीच्या कृषिधिकारी सारिका लोकरे,आदींचा सत्कार करण्यात आला.