धरिञी विघालेयचा चिञकला परीक्षेत शंभर टक्के निकाल

वागदरी , दि.०८
 
आलियाबाद येथिल धरिञी विद्यालय   (आपलं घर)  विद्यार्थ्यांचा शासकीय चिञकला ग्रेड एलिमेंटरी व इंटरमिजिट परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे.
  

एलिमेंटरी परीक्षेमध्ये २४ विद्यार्थी  प्रविष्ट झाले  होते.यामध्ये विशेष प्राविण्यामध्ये मोरे अनिरुध्द ,कदम संस्कृती यांनी यश संपादन केले. ४ विद्यार्थ्यांनी अ श्रेणी तर १८ विघार्थ्यांनी ब श्रेणी यश प्रात्त केले.इंटरमिजिएट १० विघार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते .यामध्ये ३ विद्यार्थी अ श्रेणी प्रात्त केली तर ७ विद्यार्थी ब श्रेणी संपादन केले .यशस्वी विघार्थ्यांना कलाशिक्षक रमेश चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.संस्थेचे अध्यक्ष बाबुराव भाऊ चव्हाण ,संस्थेचे सचिव  सयाजी शिंदे ,संस्थेचे कोषाध्याक्ष मल्लिनाथ माळगे ,संस्थेचे उपाध्यक्ष भिमराव मोरे ,संस्थेचे सहसचिव वसंतराव रामदासी,संस्थेचे सदस्य किरण पाटील ,अनिल पाटील ,नीता पाटील ,अर्चना डुकरे ,सुभाष दासकर  ,सुभाष स्वामी , मुख्याध्यापक महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार प्रात्त सुनील पुजारी व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी ,पालकांनी  अभिनंदन व कौतुक केले.
 
Top