बहुजन हिताय वसतिगृह म्हणजे मन मेंदू आणि मनगटाचे सक्षमीकरणाची कार्यशाळा - गायकवाड

नळदुर्ग,दि.०८

 महात्मा ज्योतिबा फुले आणि राजर्षी शाहू महाराजांनी या देशात बहुजनांच्या उत्कर्षासाठी शिक्षण आणि वसतिगृहाची चळवळ सुरू केली.त्यांच्या चळवळीला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून घटनात्मक आधिकार मिळवून दिला.या महामानवांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून बहुजन हिताय वसतिगृहाची वाटचाल सुरू असून बहुजन हिताय वसतिगृह म्हणजे शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचे मन मेंदू आणि मनगटाचे सक्षमीकरण करण्याची एक कार्यशाळा असल्याचे रिपाइं (आठवले)चे जिल्हा सचिव  एस.के.गायकवाड यांनी बहुजन हिताय वसतिगृह उमरगा येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना  सांगितले.


  बहुजन हिताय वसतिगृह गुंजोटी रोड उमरगा येथे तुळजापूर,उमरगा, लोहारा,तालुक्यातील माजी विद्यार्थ्यांच्या पालकांनी या वसतिगृहाला सस्नेह भेट दिली. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात एस.के. गायकवाड बोलत होते.
  

या याप्रसंगी  बलभीम लक्ष्मण सुरवसे यांनी या वसतिगृहास ५० नग स्टीलचे ताट व ग्लास देणगी स्वरुपात भेट दिली. प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
 
 कार्यक्रमचे प्रास्ताविक वसतिगृहाचे अधिक्षक धम्मचारी प्रज्ञाजीत यांनी  तर सुत्रसंचलन व आभार  सहशिक्षक वसंत पासेमे यांनी केले. यावेळी दहिटणा ग्रा.प.सदस्य बाबुराव वाघमारे,भिमशाहीर रामचंद्र कांबळे, रिपाइं दहिटणा शाखा प्रमुख, परमेश्वर कांबळे,माजी ग्रा.प. सदस्य  केरनाथ वाघमारे, युवराज गायकवाड, नागनाथ गायकवाड आष्टा (कासार),एस.एल.मोरे, क्रांतीविर  हरीबा गायकवाड,मातोश्री गंधाराबाई गायकवाड, मेजर जिवन कांबळे, धनपाल गायकवाड,कल्पना कांबळे (कदेर), सोजरबाई बनसोडे, भूमिका सुरवसे , बनसोडे सह विद्यार्थी  उपस्थित होते.
 
Top