रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत नळदुर्ग शहरात पथनाटयच्या माध्यमातुन प्रवाशी, वाहनचालकासह नागरिकात महामार्ग पोलिसानी केली जनजागृती
नळदुर्ग ,दि.०७
रस्ता सुरक्षा अभियान -2024 च्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वरील नळदुर्ग शहरातील बाजारपेठ व बस स्थानकाजवळ पथनाटयच्या माध्यमातुन प्रवाशी, वाहनचालकासह नागरिकात महामार्ग पोलिस केंद्र नळदुर्गच्यावतीने जनजागृती करण्यात आली.
अपर महासंचालक (वा) मुंबई सुखविंदर , पोलीस अधीक्षक महामार्ग छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र श्रीमती डाॕ अनिता जमादार , विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्रीकांत डीसले ,पोलिस निरिक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अभियान -2024 चे अनुषंगाने पथनाट्यकार अशितोष नाटकर व त्यांच्या पथकातील विद्यार्थी यांच्यासह वाहतूक सुरक्षा नियम व अपघातानंतर जखमींना मदत करणे बाबत पथनाट्याच्या माध्यमातून प्रात्यक्षिके दाखवून अपघातग्रस्त जखमींना मदत करणे, याबाबत संदेश देण्यात आला.
तसेच NHAI अधिकारी कर्मचारी यांचे समवेत ॲम्बुलन्स बोलावून घेऊन पथनाट्य कार्यक्रम आयोजित केला व त्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना वाहनचालकांना अपघातग्रस्तांना मदत करणे व वाहतूक नियमांचे पालन करणे याबाबत संदेश देण्यात आला. वाहतूक नियमाचे पालन करणे बाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात आले व माहिती पत्रके वाटण्यात आली आहेत.
वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये,वाहनाचे कागदपत्र सोबत ठेवणे, दारू पिऊन वाहन चालू नये, ट्रिपल सीट प्रवास करू नये,मोटर सायकल चालविताना हेल्मेटचा वापर करावा,वेग मर्यादाचे पालन करावे, ओव्हरटेक करताना उजव्या बाजूने वाहन चालवावे,चालक परवाना आवश्यक आहे,मोटर वाहन कायद्याअंतर्गत वाढ झालेल्या दंडाच्या रकमेबाबत समजावून सांगितले,जड वाहन धारकांना सोबत क्लीनर ठेवणे बाबत सूचना दिल्या,घाटातून वाहन चालविताना वेग मर्यादा अति आवश्यक आहे याबाबत गव माहिती दिली,वाहन चालवितांना मोबाईल फोनचा वापर टाळावा,वाहनांवर विशेषतः पाठी मागील बाजू रिफ्लेक्टर लावावे,महामार्गावर धोकादायक परिस्थितीत कोणतेही वाहन थांबवू नये,वाहन चालविताना वेग मर्यादाचे पालन करावे,वाहन चालवताना वाहतूक चिन्हे पाहून त्या सूचना प्रमाणे वाहन चालवावे,चारचाकी वाहन चालवताना चालक तसेच सर्वच प्रवाशांनी सीटबेल्ट वापरावे,
आपापल्या परिवारातील लोकांना वरील नियमाचे पालन करण्याबाबत सांगावे,ज्या वाहनांवर प्रलंबित दंड आहेत त्यांनी म.पो.केंद्राशी संपर्क साधून तात्काळ दंड भरून घ्यावेत. याबाबत मार्गदर्शन करुन मृत्युंजय दूत संकल्पनेची सविस्तर माहिती देण्यात आली,मोटर सायकल स्वार तसेच जड वहान चालकांना वाहने चालविताना घेण्याबाबतची काळजी व खबरदारी तसेच स्वतःची व दुसऱ्याची हानी होणार नाही, याबाबत सूचना दिल्या आहेत.
यावेळी नळदुर्ग महामार्ग पोलिस.केंद्राचे पोलीस उपनरीक्षक सज्जन वाघमोडे हे उपस्थित होते.