समाजवादी पार्टी तर्फे मराठवाडा भूषण साथी पन्नालाल सुराणा यांचा सत्कार!

धाराशिव दि ०६:

 महात्मा गांधी मिशन तर्फे साथी पन्नालाल सुराणा यांना मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे .त्यांचा सत्कार नळदुर्ग येथील 'अपलं घर' येथे समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी केला आहे .


त्यांना यापूर्वीही 2013 मध्ये शाहू- फुले- आंबेडकर विचारधारा पुढे नेणाऱ्या मान्यवरास समता प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा सत्यशोधक दिनकरराव जवळकर पुरस्कार देण्यात आला होता. भारतातील  समाजवादी चळवळीला तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम समाजवादी नेते जयप्रकाश नारायण, डॉ राम मनोहर लोहिया ,बॅ नाथ पै, कर्पुरी ठाकूर यांच्या प्रमाणेच साथी पन्नालाल सुराणा हेही आयुष्यभर समाजवादी विचार व सामाजिक काम करत आहेत. मा. पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी साथी पन्नालाल सुराणा यांना राज्यपाल होण्यासाठी पत्र पाठवले होते परंतु पन्नालाल सुराणा यांनी मला राजभवनाच्या शिष्टाचाराच्या बंधनात अडकवू नका असे सांगून मला सर्वसामान्य माणसात काम करायचे आहे असे स्पष्टपणे सांगितले .त्यांचे मराठवाडा भूषण पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन  होत आहे .त्यांचा  सत्कार ॲड भोसले व जयसिंग पवार  यांनी केला आहे.
 
Top