मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे धाराशिव जिल्ह्यात

 

धाराशिव,दि.०६: 

मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे हे उद्या बुधवार ७ फेब्रुवारी रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

बुधवार,7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता मुंबई येथून शासकीय विमानाने लातूरकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता लातूर विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने ढोकी हेलिपॅड, धाराशिवकडे प्रयाण.सकाळी 11.55 वाजता ढोकी हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने तेरणा सहकारी साखर कारखाना मैदान,तेरणानगर,ढोकीकडे प्रयाण.दुपारी 12 वाजता आयोजित शिवसंकल्प अभियान - कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमाला  उपस्थित राहतील.दुपारी 2 वाजता राखीव. दुपारी 2.30 वाजता मोटारीने ढोकी हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 2.35 वाजता ढोकी हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने लातूर विमानतळाकडे प्रयाण करतील.

 
Top