माधवराव पाटील महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा
मुरुम, ता. उमरगा, दि.२७
येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या मराठी पदवी-पदव्युत्तर विभागाच्या वतीने कविवर्य कुसुमाग्रज जन्मदिवसाच्या निमित्ताने मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
कविवर्य वि. वा. शिरवाडकर यांचा मंगळवारी रोजी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, डॉ. नागनाथ बनसोडे, प्रा. सोमनाथ व्यवहारे, डॉ. दिनकर बिराजदार, डॉ. महेश मोटे, डॉ. मुकुंद धुळेकर, डॉ. राजू शेख, डॉ. रमेश आडे, डॉ. अरविंद बिराजदार, डॉ. भिलसिंग जाधव, प्रा. अशोक बावगे, डॉ. नरसिंग कदम, डॉ. महादेव कलशेट्टी, डॉ. अप्पासाहेब सूर्यवंशी, डॉ. अरुण बावा, डॉ. नागोराव बोईनवाड, प्रा. गोपाळ कुलकर्णी, डॉ. रवींद्र आळंगे, डॉ. रवींद्र गायकवाड, डॉ. राजेंद्र गणापूरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कवीवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करताना चंद्रकांत बिराजदार, नागनाथ बनसोडे, सोमनाथ व्यवहारे, दिनकर बिराजदार व अन्य.