पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा  जाहीर निषेध

वागदरी,दि.१५

जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पुणे येथे झालेल्या भँड हल्ल्याचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तालुका शाखा तुळजापूरच्या वतीने जाहीर निषेध करून हल्लेखोरावर कडक कारवाई करण्यात यावी असी मागणी करण्यात आली.
   

या संदर्भात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तुळजापूर तालुका शाखेच्या वतीने नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे याना एक लेखी निवेदन देण्यात आले असून त्यात म्हटले आहे की,जेष्ठ पत्रकार निखिल वागळे हे एका कार्यक्रमासाठी नुकतेच पुणे येथे आले असता काही जणांनी त्यांच्या गाडीवर भँड हल्ला केला. त्या हल्ल्यात त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सदर घटनाही निंदनीय असून लोकशाहीचा गळा घोटणारी आहे. पत्रकार निखिल वागळे यांच्यावर  झालेल्या भँड हल्ल्याचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई तालुका शाखा तुळजापूरच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असून 
हल्लेखोरावर कडक कारवाई करण्यात यावी असी मागणी करण्यात येत आहे.
  

नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे याना देण्यात आलेल्या निवेदनावर पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अरूण लोखंडे, मंत्रालयीन प्रतिनिधी प्रकाश गायकवाड,पत्रकार भैरवनाथ कानडे, ईरफान काझी,आयुब शेख,एस.के.गायकवाड, शामकांत नागीले, किशोर धुमाळ,संजय पिसे,सतिश राठोड आदी पत्रकारांच्या सह्या आहेत.
 
Top